रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

टीव्ही अभिनेत्री रूही सिंह विरोधात गुन्हा दाखल

टीव्ही अभिनेत्री रूही सिंह हीच्या विरोधात दारू पिउन गाडी चालवणे तसेच पोलिसांना मारहाण केल्‍याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी या अभिनेत्रीसोबत असलेल्‍या तिच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे.
 
याविषयी अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री रूही आणि तीचे चार मित्र रात्री उशीरा एका पबमधून येत होते. यावेळी रस्‍त्‍यात बांद्रा इथल्‍या एका मॉलमध्ये टॉयलेटसाठी ते थांबले. यावेळी मॉलच्या स्‍टाफकडून त्‍यांना आत जाताना रोखण्यात आले. त्‍यामुळे मॉलचा स्‍टाफ आणि रूही आणि तिच्या मित्रांमध्ये जोरदार वादावादी झाली. यानंतर इथल्‍या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली.  या माहितीवरून पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले. येथील अधिकार्‍याच्या माहितीनुसार यावेळी रूही आणि तिच्या दोन मित्रांनी दोन पोलिसांनाच मारहाण केली. हे सर्व मॉलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. दरम्‍यान या प्रकरणी पोलिसांनी राहुल आणि स्‍वप्नील या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर, रूही आणि तिच्या इतर दोघा मित्रांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती.