बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आली लहर केला कहर: अशक्य जोक

गुरुजी : गण्या सांग बरं प्राचीन भारतात गणित आणि भूमिती किती प्रगत होती??
गण्या : श्रीमद् भगवतगीतेत पार्थ म्हणून ज्या अर्जुनाचा उल्लेख केला, त्या पार्थाचा गौरवर्णीय यवनीपासून झालेला पुत्र म्हणजेच पार्थागोरस(पायथागोरस)..!!
हा पुत्र यवनीच्या पोटी जन्मला असल्याने त्यास सर्वजण विदेशी म्हणून हिणवू लागले.
तेव्हा अर्जुनाचा सहोदर बंधू कुंतीपुत्र कर्ण याने त्यास आश्रय दिला, कारण तोही कुंतीपुत्र असूनही उपेक्षित वर्गातील होता.
"पार्थागोरस, तू आणि मी पांडव असूनही एकाच उपेक्षित वर्गातील आहोत , तुझा नि माझा वर्ग एकच आहे".
कर्णाच्या वाक्याने 'कर्ण' आणि 'वर्ग' हे दोन शब्द, पायथागोरसच्या मनावर लहानपणीच कोरले गेले.
त्यामुळेच कर्णाच्या या कृतीने उपकृत होवून पायथागोरस ने कर्ण हा इतरांपेक्षा मोठा असा सिद्धांत मांडला.
त्यातूनच पुढे कर्ण वर्ग हा इतर दोन भुजांच्या वर्गाबरोबर असतो असे मत मान्य झाले.
त्याच्या या सिद्धान्ताचे विचार वर्तुळ व्यास मुनींनी पूर्णं केल्यामुळे, वर्तुळाचा व्यास हा वर्तुळास दोन समान भागात विभागतो असा गणितीय सिद्धांत पुढे प्रसूत झाला.
कंस हा तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा मामा. तो गणितात कच्चा होता, देवकीच्या मुलांना मारताना त्याचे गणित चुकले आणि कृष्ण जन्म होऊन त्याचा मृत्यू अटळ बनला.
कृष्णाच्या हातून मोक्ष प्राप्ती होत असताना कंसाने इच्छा प्रकट केली होती की, गणितात माझ्या नावाने काहीतरी असावे म्हणून, कंसाच्या वधानंतर त्याचे स्मरण असावे म्हणून गणितात ( ) कंस वापरतात.
यावरून प्राचीन भारतात गणित आणि भूमिती किती प्रगत होती, हे सिद्ध होते.
 
सगळा वर्ग ICU मध्ये आहेत.