शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 जानेवारी 2019 (09:32 IST)

राज यांची सरकारवर पुन्हा टीका व्यंगचित्र

राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र रेखाटलं असून, या व्यंगचित्रात 2014 ते 2018चा काळ दाखवण्यात आला आहे. या व्यंगचित्रात एक वयोवृद्ध माणूस एका लहान मुलाच्या हातात(पॉवर की) किल्ली देत असल्याचं पाहायला मिळतंय. बेटा, खूप त्रास सहन केला रे आम्ही! आम्ही जी चूक केली तशी तू करू नकोस, जबाबदारीनं वागशील ही अपेक्षा, असा मजकूरही या व्यंगचित्रातून प्रसिद्ध करण्यात आला आहे.2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे व्यंगचित्र काढण्यात आले आहेत. हे व्यंगचित्र राज ठाकरेंच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर पेजवर पोस्ट करण्यात आले आहे.