शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By

सैराट २ येतोय, ही अभिनेत्री चित्रपटात असून अशी आहे कथा

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामधील प्रमुख भूमिका कोण करणार आहे, कथा काय असेल यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. एका खासगी मराठी वृत्तवाहिनीने  दिलेल्या वृत्तानुसार या सिनेमाचे शुटिंगही सुरु झाले आहे. त्यामुळे प्रेक्षकात मोठ्या प्रमाणात उत्सुकता वाढली आहे. 
 
या आगोदरच्या चित्रपट सैराट ने लोकांना प्रचंड मोठा धक्का दिला होता. त्यामुळे आता सैराट २ मध्ये कथा काय असणार अशी उत्सुकता आहे. बाहेर आलेल्या वूत्तानुसार आगोदारची मुख्य पात्र असलेले  आर्ची , परशाचा मुलगा मोठा झाला आहे. 
 
असे चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. आर्ची - परशा हैद्राबादला पळून आल्यानंतर सुमन अक्काने त्यांच्या पाठिशी उभे राहिले होता. आता  हीच अक्का म्हणजेच छाया कदम त्यांच्या मुलाचे संगोपन करणार असून , त्यानंतर त्याचा ताबा अक्का त्याच्या मावशीकडे देणार आहे. या सिनेमात या मावशीची भूमिका मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेली दिल चाहाता है फेम सोनाली कुलकर्णी साकारणार आहे. चित्रपटाच्या कथेत आपल्या आई वडिलांचा खून केलेल्या प्रिन्स मामाचा त्यांचा मुलगा बदला घेणार की चित्रपटाद्वारे एक वेगळा संदेश देणार,  हे अद्याप तरी समजू शकले नाही.  पुण्याच्या चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात सैराट 2 या नावाची नोंदणी झाल्याचे वृत्त देखील त्यांनी दिले आहे. त्यामुळे आता या सिनेमाचा ट्रेलर कसा असणार, नेमकी कथा कशी असणार, कोण असणार तो मुलगा त्यात शेवटी खून खराबा होणार का ? असे अनेक प्रश्न समोर आले आहेत.