सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पंढरपूर येथील उद्धव ठाकरे यांच्या भाषण समजून सांगा १५१ रु मिळवा

नेहमी प्रमाणे शिवसेनेवर मनसेने जोरदार टीका केली आहे. यावेळी  उद्धव ठाकरेंनी पंढरपुरात जे भाषण केले त्यावर मनसेने खोचक टोलेबाजी केली  असून, उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ जर कोणी सांगितला त्याला 151 रुपये बक्षिस दिले जाईल असी  ऑफर मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिलीय. शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये विळ्या भोपळ्याचं सख्य आहे हे महाराष्ट्र जाणतो आहे. सोमवारी पंढरपूर येथे  उद्धव ठाकरेंनी जे भाषण केले त्यावरही मनसेने टीका केली आहे.
 
मनसे टीका करतांना म्हणत आहे की,  उद्धव ठाकरे एका बाजूला  म्हटले होते की 25 वर्षे युतीमध्ये राहून शिवसेना सडली आहे.  त्यानंतर युती होणार नाही असेही त्यांनी सांगितले. मात्र पंढरपूरमध्ये बोलताना युतीचा निर्णय जनताच घेणार असे त्यांनी म्हटले आहे.. त्यांच्या या वेगळ्या वक्तव्यातून नेमका काय अर्थ काढायचा हे आम्हाला तरी कळत नाही. त्यांच्या भाषणाचे विश्लेषण आणि अर्थ जो कोणी आम्हाला समजावून सांगेल त्याला आम्ही 151 रुपये बक्षीस देत आहोत अशी खोचक प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणे आता पुन्हा शिवसेना आणि मनसेचा वाद रंगणार आहे.