मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मला जागा वाटपाट रस नाही , शेतकरी कर्ज मुक्त करा , तुम्हाला ठोकून काढू - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्ष प्रमुख यांनी भाजपवर पंढरपूर येथे जोरदार टीका केली आहे. ठाकरे यांनी भाजपा सरकारला जुमला सरकार असे म्हटले आहे तर जसे छत्तीसगड येथे सत्ता उलटून टाकली तशी सत्ता उलटून टाका असे ठाकरे यांनी नमूद केले आहे.  तुम्ही अनेक जुमले दिले त्यांना आम्ही माफ केले मात्र तुम्ही आमच्या देवा विषयी जुमले बाजी करता हे खपवून घेणार नाही असे मत उद्धव ठाकरे यांनी वुक्त केले. दैनिक सामना तील उध्वव ठाकरे यांची विस्तृत सभेतील बातमी पुढीलप्रमाणे आहे . मला जागा वाटपात स्वारस्य नाही. या सगळ्यांचं कर्जमुक्त करून पाहिजे, शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेतून नुकसान भरपाईचा पैसा अन् पैसा त्यांना दिला गेलेला पाहिजे. जागा वाटप गेलं खड्ड्यात. एवढच काय तर भाजपला सांगतो की ठिक आहे, अच्छे दिनाचा जुमला… माफ केलं, 15 लाखाचा जुमला… माफ केलं, पण आमच्या देवाधिकांच्या नावाने जुमला केला तर तुम्हाला माफ काय, ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंढपूर येथील अतिविराट सभेतून दिला.राम मंदिराचा मुद्दा मी सोडणार नाही सुटू देणार नाही. निदान आमच्या हिंदू देवतांच्या नावाने जुमले करू नका. राम आणि इतर हिंदू देवतांच्या नावावर जुमले करून तुमचे इमले बांधू नका. भाजपचे हे जुमले महाराष्ट्रात शिवसेना उध्वस्त करून टाकल्याशिवाय राहणार नाही, असेही उद्धव ठाकरे ठणकावले.अयोध्येतील यशस्वी सभेनंतर उद्धव ठाकरे यांच्या सभेचे पंढरपुरात आयोजन करण्यात आले होते. चंद्रभागेच्या पात्रात लाखो शिवसैनिक, वारकरी, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात एकत्र जमला होता. यामुळे संपूर्ण पंढरपूरचे वातावरण भगवे झाले होते. उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी पंढरपूरमध्ये जमलेला वर्गच नाही तर सारा महाराष्ट्र आणि देश आतूरला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आधी पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि मग ते चंद्रभागेच्या तीरी जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी पोहोचले. यावेळी शिवसेना झिंदाबाद, हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता.
 
आपल्या भाषणाला सुरुवात करताना उद्धव ठाकरे यांनी जनसमुदायाला नमस्कार करत पांडुरंग हा गोरगरीबांचा देव आहे आणि गोरगरिब हा शिवसेनेचा देव आहे, असं म्हणत मी या समोर उपस्थित असलेल्या विठ्ठलाला, पांडुरंगाच्या विराट स्वरुपासमोर नतमस्तक होतो, असे म्हणून नमस्कार केला. त्यानंतर आपल्या आक्रमक शब्दात त्यांनी सरकारच्या धोरणांवर वार करण्यास सुरुवात केली.मला जागा वाटपात स्वारस्य नाही. या सगळ्यांचं कर्जमुक्त करून पाहिजे, शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेतून नुकसान भरपाईचा पैसा अन् पैसा त्यांना दिला गेलेला पाहिजे. जागा वाटप गेलं खड्ड्यात. एवढच काय तर भाजपला सांगतो की ठिक आहे, अच्छे दिनाचा जुमला… माफ केलं, 15 लाखाचा जुमला… माफ केलं, पण आमच्या देवाधिकांच्या नावाने जुमला केला तर तुम्हाला माफ काय, ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंढपूर येथील अतिविराट सभेतून दिला. राम मंदिराचा मुद्दा मी सोडणार नाही सुटू देणार नाही. निदान आमच्या हिंदू देवतांच्या नावाने जुमले करू नका. राम आणि इतर हिंदू देवतांच्या नावावर जुमले करून तुमचे इमले बांधू नका. भाजपचे हे जुमले महाराष्ट्रात शिवसेना उध्वस्त करून टाकल्याशिवाय राहणार नाही, असेही उद्धव ठाकरे ठणकावले.अयोध्येतील यशस्वी सभेनंतर उद्धव ठाकरे यांच्या सभेचे पंढरपुरात आयोजन करण्यात आले होते. चंद्रभागेच्या पात्रात लाखो शिवसैनिक, वारकरी, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात एकत्र जमला होता. यामुळे संपूर्ण पंढरपूरचे वातावरण भगवे झाले होते. उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी पंढरपूरमध्ये जमलेला वर्गच नाही तर सारा महाराष्ट्र आणि देश आतूरला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आधी पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि मग ते चंद्रभागेच्या तीरी जमलेल्या प्रचंड जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी पोहोचले. यावेळी शिवसेना झिंदाबाद, हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता.