शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबई विद्यापीठाचा ऑनलाइन गोंधळ सुरुच

भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर शिक्षणव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला मुंबई विद्यापीठातला गोंधळ संपता संपत नाही. सरकार मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही. मुंबई विद्यापीठाच्या पीचडीसाठी पूर्वपरीक्षा म्हणजेच 'पेट' यंदा प्रथमच ऑनलाइन घेण्यात आली. मात्र याच विद्यापीठाने नेहमीप्रमाणे मोठा गोंधळ घालून ठेवला आहे. रिसर्च मेथडॉलॉजी हा पेपर सर्वच विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये देऊन टाकला. यामुळे इतर भाषांमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला तर अनेक ठिकाणी नेटवर्क डाऊन झाल्याने परीक्षा काही वेळ उशिराने सुरू झाली. या परीक्षेस सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मराठी, इतिहास यांसारख्या विषयांमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रिसर्च मेथडॉलॉजीचा पेपर ५० मार्कांचा आल्याने अनेक जण गोंधळात पडले. अनेकांना या गोंधळातच परीक्षा द्यावी लागली तर अनेकांनी प्रश्न सोडून दिले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
 
ऑनलाईनच्या नावाखाली विद्यार्थी भरडला जात आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापनाला या समस्या दिसत नाहीत का, असा सवाल प्रश्न मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अमोल मटाले   यांनी प्रशासनाला विचारला आहे. अनेक आश्वासने देऊन त्याची पूर्तता या सरकारकडून झाली नाही. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही असे मातेले यांनी स्पष्ट केले.