शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 22 एप्रिल 2019 (18:40 IST)

मावळचा मतदारसंघ तर पवारांनी नातवाला थेट चॉकलेट म्हणून दिला - आंबेडकर

सध्या पुण्यामध्ये लोकसभेचे जोरदार वातवरण तापले आहे. त्यामुळे पुणे येथील जागा आपल्या पक्षाला मिळावी म्हणून सर्व प्रयत्न करत आहेत. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी रविवारी पुण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आत्ताची लोकसभा निवडणूक होतेय टीम फक्त नातवाचे लाड पुरवणारी निवडणूक झाली असून, मावळचा मतदारसंघ तर पवारांनी नातवाला थेट चॉकलेट म्हणून दिला आहे अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे. पुण्यातून भाजप-शिवसेना युतीकडून गिरीश बापट, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मोहन जोशी, तर वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव निवडणूक मैदानात आहेत. कमी कालावधी मध्ये राज्यात वंचित बहुजन आघाडीने मोठे आवाहन उभे केले आहे. 
 
सध्याचे राजकारण थट्टा मस्करीचे झाले आहे. वंचितांना आव्हान देत मावळचा मतदारसंघ चॉकलेट म्हणून वापरण्यात येत आहे. तो आता नातवाला थेट चॉकलेट म्हणून दिला आहे अशी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर टीका केली आहे. 
 
लोकसभेचा मावळ मतदारसंघ कोण्या एका घराची जहागिरी नाही, म्हणत त्यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिले. आंबेडकरांनी पार्थ पवार केले ते म्हणाले की उद्याची सत्ता रेव्ह पार्टी करणाऱ्यांच्या हातात देणार का? असा जहरी प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे मावळची जागा राखण्याचे मोठे आवाहन आता राष्ट्रवादी कॉंग्रेस समोर आहे.