शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 25 एप्रिल 2019 (09:51 IST)

भाजपकडून 27 एप्रिलला ‘दाव रे तो व्हिडीओ’

मनसेच्या प्रत्येक सभेत ‘लाव रे तो व्हिडीओ’, असे आदेश देत व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीका करणारे मनसे नेते राज ठाकरे यांच्याविरोधात, आता भाजपही मैदानात उतरला आहे. मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ला भाजपकडून 27 एप्रिल रोजी ‘दाव रे तो व्हिडीओ’ असे प्रत्युत्तर देत, राज यांचा पोलखोल केला जाणार आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे स्टार प्रचारक विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे हे सभा घेत आहेत. प्रत्येक सभेमध्ये पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष शहा यांचे मागील व्हिडीओ दाखवत ते टीका करत आहेत. त्यामुळे राज यांना त्याच स्टाईलने भाजप 27 तारखेच्या सभेत उत्तर देणार आहोत. 27 एप्रिलनंतरही त्यांनी त्यांच्या सभा सुरू ठेवाव्यात, असे आव्हान तावडे यांनी दिले.