गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 6 मे 2019 (10:10 IST)

दात काढत आहात सावधान, दातांची शस्त्रक्रिया करतांना मुलीचा मृत्यू

दात हा आपल्या शरीरातील महत्वाचा भाग आहे. तर दातातदुखले तर ते सरळ मेंदूशी निगडीत असते. त्यामुळे दाताची शस्त्रक्रिया फार सावध आणि योग्य डॉक्टर कडे करावी लागते. मात्र शस्त्रक्रिया चुकीची झाल्याने एका मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. पुणे येथील पिंपरी चिंचवडचीमधील निगडी प्राधिकरण परिसरातील उच्चभ्रू परिसरात असलेल्या स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दाताचे दुखणे समोर आल्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा अतिरक्तस्राव होऊन दुर्दैवी मृत्यू झालाय. या शस्त्रक्रियेत धनश्री जाधव 23 वर्षीय मुलीचा मुर्त्यू झाला आहे. या गंभीर प्रकरणी धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसात डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणाची तक्रारी दाखल केली आहे.
 
मागील दीड वर्षांपासून धनश्रीच्या दातांमध्ये समस्या उत्पन्न झाली होती, त्यामुळे ती निगडीच्या नामांकित स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयात दीड वर्षांपासून उपचार घेत होती. त्यानुसार धनश्री ही आठ दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात दाखल झाली. तिच्यावर उपचार सुरुही झाले. परंतु ज्यावेळी उपचार सुरू होते. त्यावेळेस धनश्रीचा अतिरक्तस्राव झाल्याने धनश्रीची प्रकृती ढासळली होती, याच घटनेकडे नामांकित स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाकडे दुर्लक्ष केले. त्यात धनश्रीचा मृत्यू झाला आहे. असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. घटना समजताच स्टर्लिंग आयर्वेदिक रुग्णालयातील डॉक्टर पाटील दाम्पत्य फरार झाले आहे. धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसांत तक्रार अर्ज केला आहे. त्यानुसार निगडी पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे दातांचे दुखणे योग्य डॉक्टर कडून तपासून घेणे गरजेचे आहे.