मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 मे 2019 (09:50 IST)

या गोष्टी पहिल्यांदाच ऐकत आहे : मनोहर जोशी

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंना फोन करुन बोलवणे आणि त्यांना शिवसेनेतून न काढल्यास उध्दव ठाकरेंनी घर सोडून जाण्याची दिलेली धमकी याबाबत राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलेल्या आरोपात तथ्य नाही, अशी टीका शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केली आहे.ते म्हणाले, या गोष्टी मी पहिल्यांदाच ऐकत आहे. चांगले शिक्षण हे महत्वाचे असते. पण काही लोक शिक्षित नाही, असा राणेंचे नाव न घेता जोशींनी टोला लगावला. 
 
नो होल्डस बार्ड (बेधडक) या नावाने राणे यांचे आत्मचरित्र नुकतेच बाजारात आले आहे. या आत्मचरित्रात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवरही टीका केली आहे.