1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

तब्बल पाच हजाल लिटर पेट्रोल आणि डिझेल वाया गेले

maharashtra news
पुण्यातील वारजे महामार्गावर पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टँकर उलटला असून या अपघातामुळे टँकरमधील तब्बल पाच हजाल लिटर पेट्रोल आणि डिझेल वाया गेले आहे. बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास वारजे येथील महामार्गावर मुंबईकडून कात्रजच्या दिशेने जाणारा टँकर उलटला.  यावेळी टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर वाहून गेले. 
 
 ‘घटनास्थळी पोहोचल्यावर आम्ही पेट्रोल, डिझेल ज्या भागात पडले होते. तिथे वाळू टाकून पुढे जाण्याचा प्रवाह कमी केला. मात्र तोवर टँकर मधील अंदाजे पाच हजार लिटर डिझेल आणि पेट्रोल पाचशे मीटर भागात वाहून गेले होते. या घटनेमुळे कोणतीही घटना घडू याची काळजी घेण्यात आली असून उलटलेला टँकर क्रेनच्या रस्त्याच्या कडेला नेण्यात आला आहे’, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.