1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (15:50 IST)

शिवसेनेचा सरकारला दैनिक सामनातून सल्ला

Shiv Sena advises govt
आर्थिक मंदीबाबत कितीही उलटसुलट सांगितलं, तरी सत्याचा कोंबडा आरवला आहे आणि मौनीबाबा डॉ. मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दात सांगितलेल्या सत्याचा स्फोट झाला आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच देशाचं हित आहे, असा सूचक सल्ला शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजप सरकारला दिला आहे. भारताचा आर्थिक विकास दर घसरल्याने प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.
 
‘गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार या पुरताच उरला आहे. त्यातून ‘देशाची व्यवस्था’ नष्ट होत आहे. आर्थिक मंदीचं राजकारण करु नये आणि तज्ज्ञांच्या मदतीने देश सावरावा, असं आवाहन मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केले आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच देशाचं हित आहे’, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.