शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुन्हा एकदा ‘उत्कृष्ट संसदपटू’

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून निवड करण्यात आली आहे. सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून सुळेंची निवड करण्यात आली आहे.पहिल्या सत्रांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतील उपस्थिती १०० टक्के राहिली आहे.संसदेच्या पहिल्या सत्रांमध्ये सुप्रिया सुळे यांनी ३४ चर्चासत्रात भाग घेतला. चार खासगी विधेयकं मांडली. १४७ प्रश्न उपस्थित केले आहेत. 
 
१६ व्या लोकसभा सत्रामध्ये १०१६, १०१७, आणि २०१८ मध्येही सुळे यांची सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून निवड करण्यात आली होती. गेल्या लोकसभेत सुळे यांनी ११८१ प्रश्न विचारले होते. तर २२ खासगी विधेयकं मांडली होती. १५२ वेळा चर्चेत सहभाग नोंदवला होता. तसेच संसदेत १०० टक्के हजेरी लावली होती.