बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 13 मे 2020 (21:55 IST)

राणा डग्गुबती म्हणतो, 'ती हो म्हणाली'

'बाहुबली' फेम या अभिनेत्याला त्याच्या जीवनभरासाठीच्या एका अनोख्या आणि तितक्याच सुरेखशा नात्याची माहिती दिली आहे. राणा डग्गुबतीने सोशल मीडियावर एका सुरेख फोटोसह याविषयीची माहिती दिली. राणाच्या प्रेमाचा स्वीकार करणारी ती आहे, मिहीका बजाज. 
 
'... ती हो म्हणाली', असं लिहित राणाने मिहिकासोबतचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्या दोघांचीही रिअल लाईफ केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. अतिशय अनोख्या अंदाजात या नव्या जोडीच्या प्रवासाची झालेली सुरुवात पाहता, येत्या काळात ते दोघंही लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होत आहे. चाहत्यांना याविषयीची माहिती मिळताच सोशल मीडियावर त्यांनी राणा आणि मिहिकाला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.