सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (16:38 IST)

स्वप्न ज्योतिष : वैवाहिक जीवनाबद्दल संकेत देणारे शुभ- अशुभ स्वप्नाचे रहस्य जाणून घ्या

लग्न म्हटले की प्रत्येकाच्या अंगावर शिरशिरी येते. प्रत्येक तरुण हे जाणण्यास उत्सुक असतो की त्यांचा जोडीदार कसा असेल? कोण असेल? जोडीदार मनासारखा असेल का? 
आपले स्वप्न आपल्याला वैवाहिक आयुष्य कसे असेल ह्याची माहिती देतात. लग्न कधी होईल लवकर होईल की उशिरा ? हे सगळे सूचित करते. चला तर मग काही स्वप्नांचे संकेत चिन्हे जाणून घेऊ या....
 
1 स्वप्नात इंद्रधनुष्य बघणे शुभ असते. वैवाहिक जीवनातील इच्छा पूर्ण होतात. लवकर लग्नाचेही लक्षण आहे. तसेच मोरपंख लवकर लग्नाची संकेत देतात.
 
2 स्वप्नामध्ये स्वतः नाचता असताना दिसत असल्यास लवकरच लग्न होण्याचे संकेत समजावे. अशांचे वैवाहिक जीवन आनंदी होते.
 
3 कढई केलेले वस्त्र स्वप्नात बघितल्याने सुंदर आणि व्यवस्थित आचरणाची बायको मिळते.
 
4 स्वप्नात आपल्याला सोन्याचे दागिने भेट मिळाल्यास अशा व्यक्तीला श्रीमंत जोडीदार मिळतो. 
 
5 स्वप्नात मेळ्यात फिरणे असे बघणे शुभ सूचक असते. जोडीदार योग्य मिळतो.
 
6 स्वप्नात एखाद्या स्त्री किंवा पुरुषाने मृतदेह बघितल्यास अशुभ असते. अश्या व्यक्तीचे वैवाहिक संसार कलहकारी असते.
 
7 स्वप्नांत बोगद्या मधून प्रवास करणे अशुभ असते. वैवाहिक जीवनात अडथळे येतात.
 
8 स्वप्नात पुजारी, किंवा इतर कोणतेही धर्मगुरु दिसल्यास वैवाहिक जीवनात दुरावा येतो. विघटनाची परिस्थिती उद्भवते.
 
9 स्वप्नात स्वतःला हिरा किंवा हिऱ्याचे दागिने मिळताना बघणे चांगले नसते. अश्या माणसांचे वैवाहिक जीवन सुखी होत नाही.
 
10 पुरुष स्वतःची दाढी करीत असताना किंवा इतर कोणाकडून करवत असल्याचे स्वप्न बघितल्याने वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी संपतात.