मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2020 (15:33 IST)

अश्विनी नक्षत्र : या नक्षत्रात जन्म घेणारे जातक कसे असतात जाणून घ्या

अश्विनी नक्षत्र जसे सार्वजनिक सरावामध्ये एका स्थळा पासून दुसऱ्या स्थळाचे अंतर मैल, कोस किंवा किलोमीटरमध्ये मोजणी केली जाते. त्याच प्रमाणे अवकाशातील अंतर नक्षत्रांमध्ये मोजले जाते. आकाशातील ताऱ्यांच्या गटास नक्षत्रे असे म्हटले जाते. कधी कधी आपण या तारांच्या गटामध्ये काही आकार जसे की घोडा, साप बघत असतो.  ह्या आकृतीचं नक्षत्र असतात. 
 
ज्योतिषशास्त्रात, संपूर्ण अवकाशाचे विभाग 27 भागांमध्ये विभागले गेले आहे आणि प्रत्येक भाग प्रत्येक नक्षत्राच्या नावांवर आहे. तंतोतंत स्पष्ट करावयास प्रत्येक नक्षत्राला 4 भागामध्ये वाटले आहे त्यांना चरण म्हणतात. 
 
अश्विनी नक्षत्राबद्दल जाणून घेऊ या....
धर्माग्रंथानुसार अश्विनी नक्षत्रात जन्मलेली व्यक्ती सुंदर, स्थूल शरीराची, अत्यंत हुशार, सत्यवान, नम्र, सेवा केंद्रित, सर्वांना प्रिय, श्रीमंत आणि भाग्यवान असतात. हे व्यक्ती धनवान आणि भाग्यवान असते. सर्व प्रकारांचे मालमत्तेचे संपादन करते. स्त्री, दाग-दागिने, संपन्न घराचे समाधान मिळते. 
 
अश्विनी नक्षत्रांमध्ये जन्म घेतल्यामुळे ईश्वर भक्त हुशार, कामात कौशल्यवान रत्न आणि दागिने प्रेमी असतात. संपत्तीच्या बाबतीत काळजी घेणारे, रागीट, मोठा भाऊ असो व नसो, किंवा आजारी असो, नेतृत्व प्रधान, ज्योतिषविद, वैद्य, शास्त्रामध्ये आवड ठेवणारे, प्रवास करणारे, चंचल प्रवृत्तीचे, महत्वाकांक्षी असतात. 
 
ह्या नक्षत्रात जन्म घेणारे व्यक्ती क्षत्रिय, वस्य चतुष्पाद, योनी अश्व, महावैर योनी, महिष, गणदेव आणि आद्य नाड असणारे असतात. या नक्षत्रात जन्म घेणारे जातकाची रास मेष आणि राशीचा स्वामी मंगल असेल. या नक्षत्रात जन्म घेणारे दिसायला सुंदर, स्वरूप आकर्षक, रूप रंगाने छान, स्थूळ शरीर, मजबूत बांधा असणारे असतात.