बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 11 एप्रिल 2020 (14:35 IST)

या वस्तू उशाखाली ठेवल्याने ग्रह देतील वरदान, मिळतील उत्तम परिणाम

रवी, चन्द्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू असे एकूण 9 ग्रह आहे. प्रत्येक ग्रह वेगवेगळे परिणाम देतात. कधी चांगले तर कधी वाईट परिणाम देतात. तंत्र शास्त्रानुसार नवग्रहांच्या स्थिरतेसाठी काही सोपे आणि सुलभ उपाय आहेत. ज्यांना अंगीकृत केल्याने आपणांस हे ग्रह उत्तम फळ देतील आपले काहीच अनिष्ट करणार नाही.
 
1 सूर्य अनिष्ट फळ देत असल्यास तांब्याचा भांड्यात पाणी भरून पलंगाखाली ठेवणे. हे शक्य नसल्यास उशीच्या खालील बाजूस चंदन ठेवावे.
 
2 चंद्र खराब असल्यास चांदीच्या भांड्यात पाणी भरून पलंगाखाली ठेवा. शक्य असल्यास चांदीचे दागिने घाला.
 
3 मंगळ त्रास देत असल्यास काश्याच्या पात्रात पाणी भरून ठेवावे. किंवा उशीच्या खाली सोन्या चांदीचे दागिने ठेवा.
 
4 बुध ग्रहाचे अनिष्ट फळामुळे जीवनात अशांती निर्माण होत असल्यास उशीच्या खाली सोन्याचे दागिने ठेवावे.
 
5 देवगुरु बृहस्पती अनिष्ट फळे देत असल्यास एका पिवळ्या कापड्यामध्ये हळद बांधून उशीखाली ठेवावी.
 
6 शुक्राच्या शुभ फळांच्या प्राप्तीसाठी चांदीची मासोळी बनवून उशाच्या खाली ठेवावी किंवा चांदीच्या भांड्यात पाणी भरून पलंगाच्या खाली ठेवावे.
 
7 शनी संबंधित समस्या असल्यास लोखंडी भांड्यात पाणी भरून पलंगाखाली ठेवावे. किंवा उशाच्या खाली शनिदेवाचे प्रिय रत्न नीलम ठेवावे.