मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

चुकून उशाखाली ठेवू नका या वस्तू, साथीदाराशी नात्यात येऊ शकतो दुरावा

घरातील मोठे लोकं झोपताना देवाचं नाव घेऊ झोपा असे सांगत असतात. असे केल्याने भीती वाटत नाही आणि शांत झोप लागते अशी समजूत आहे. तरी काही लोकांची सवय असते की रात्री झोपताना उशाखाली हेअर क्लिप, वॉलेट, पुस्तकं सारख्या वस्तू ठेवून झोपतात.
 
परंतू अशा वस्तू उशाखाली ठेवल्याने नकारात्मकता वाढते आणि साथीदाराशी दुरावा निर्माण होतो. तर जाणून घ्या अशा कोणत्या वस्तू आहे ज्या उशाखाली मुळीच ठेवू नये.
 
औषधं
अनेक लोकांना झोपताना औषधं घेण्याची गरज असते आणि अशात विसर पडू नये म्हणून ते उशाखाली मेडिसिन ठेवतात. परंतू याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. म्हणून ही सवय लगेच सोडावी. 
 
जोडे-चपला 
अनेक लोकं आपल्या बिछान्याखाली जोडे-चपला ठेवतात. अशाने देखील नकारात्मक ऊर्जेत वृद्धी होते. म्हणून झोपताना जोडे-चपला बिछान्यापासून लांब ठेवाव्या.
 
वॉलेट किंवा पर्स
झोपण्यापूर्वी पर्स किंवा वॉलेट डोक्याशी घेऊन झोपू नये. धन हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून धन नेहमी तिजोरी किंवा लॉकरमध्ये ठेवले पाहिजे. डोक्याशी पर्स ठेवल्याने वायफळ खर्च होतात आणि नात्यांमध्ये दुरावा देखील निर्माण होतो. म्हणून पर्स नेहमी कपाटात ठेवणे योग्य ठरेल.
 
पाण्याचं भांड
पाण्याने भरलेलं भांड बिछान्याजवळ ठेवून झोपू नये. याने चंद्रमा प्रभावित होतं आणि चंद्रमाच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात नकारात्मकता येते. अनेक आजार होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.
 
किल्ली
अनेक लोकांना सुरक्षित जागा म्हणून उशाखाली किल्ल्या ठेवून झोपण्याची सवय असते. आपल्या या चुकीमुळे आर्थिक परिस्थिती वाईट होऊ शकते. म्हणून आजच ही सवय सोडा.