सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated : बुधवार, 15 एप्रिल 2020 (19:46 IST)

सध्याच्या टेन्शनच्या काळात काही हलके फुलके उखाणे

नववधू
देशपांड्याची मुलगी झाली आता जोशी 
....चे नाव घेते लॉकडाऊनच्या दिवशी
 
नवविवाहिता
Work from Home आणि डब्याची नाही घाई
.....रावांच्या प्रेमाला काही वेळकाळच नाही
 
डॉक्टरची पत्नी
चांदीच्या ताटात ठेवला केशराचा साखरभात
....रावांची ट्रीटमेंट करेल कोरोनावर मात
 
पेशंटची पत्नी
रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास
....रावांना देते Hydroxchloroquine चा घास
 
पैलवानाची पत्नी
मर्द मावळा गडी हाय, चितपट होईल कोरोना
....रावांचे नाव घेते डोंगरगावची मैना
 
अमेरिकन पत्नी
नको मला Robert नको मला Covid
मेरीचा लाडका सदा आहे David

प्रौढा
सकाळी धुणं भांडी दुपारी केर 
....रावांच्या पोटाचा कमी झालाय घेर
 
साभार: सोशल मीडिया
विशेष: हे केवळ मनोरंजनासाठी आहे. मात्र कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.