मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (13:33 IST)

अभिनेते सुशील गौडा यांनी आत्महत्या केल्याचा संशय

कन्नड अभिनेते सुशील गौडा यांचा त्यांच्या राहत्या घरात मृतदेह आढळला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 
वृत्तसंस्था PTIनं पोलिसांच्या हवाल्यानं माहिती देत म्हटलं आहे की, सुशील गौडा यांचा मृतदेह बुधवारी त्यांच्या मंड्या जिल्ह्यातील (कर्नाटक) घरात दिसून आला आहे. त्यांनी कथितरित्या आत्महत्या केल्याचं दिसून येत आहे.
 
पोलिसांच्या मते, सुशील यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
 
30 वर्षांच्या सुशील यांनी एका टीव्ही मालिकेत काम केलं होतं आणि आता त्यांचा सालागा नावाचा चित्रपटही प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात दुनिया विजय मुख्य भूमिकेत आहे.
 
दुनिया विजय यांनी सोशल मीडियावर दु: ख व्यक्त केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "मी जेव्हा त्याला पाहायचो, तेव्हा हा एक दिवस मोठा अभिनेता बनेल, असा विचार माझ्या मनात यायचा."
 
याशिवाय अभिनेते धनंजय यांनी ट्वीट करत म्हटलं की, "सुशील, तू कोणत्या परिस्थितीतून जात होता, ते मला माहिती नाही. पण, हे मात्र माहिती होतं की तुझ्याकडे एक चांगलं भविष्य होतं. तू तुझ्या चांगल्या दिवसांसाठी वाट पाहायला होती."
 
सुशील गौडा स्वतः जिम ट्रेनरही होते. अंतपुरा या गाजलेल्या कन्नड सिरिअलमध्ये त्यांचा लीडरोल होता.