गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (16:07 IST)

आंब्यासाठी धावणार स्पेशल पार्सल ट्रेन

कोकणातील आंब्यांना देशभर पोहचवण्यासाठी कोकण रेल्वेमार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, कणकवली, मडगाव आणि उडुपी या चार स्थानकांवर या पार्सल ट्रेनमध्ये माल चढवता-उतरवता येणार आहे. या पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागांत पाठवण्याकरीता करता येणार आहे. ही स्पेशल ट्रेन ओखा ते तिरुवअनंतपुरम आणि पुन्हा ओखा या मार्गावर धावणार आहे.

२० एप्रिल ही ट्रेन ओखा वरून रवाना झाली आहे. २१ तारखेला सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ही ट्रेन रत्नागिरीला, १ वाजून ४० मिनिटांनी कणकवलीला, ४ वाजून ५० मिनिटांनी मडगावला, तर ९ वाजून १० मिनिटांनी उडुपी येथे पोहोचणार आहे. तर २४ एप्रिलला ही ट्रेन तिरुवअनंतपुरम येथून निघून १ वाजून २० मिनिटांनी उडुपी, ६ वाजून १० मिनिटांनी मडगाव, रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी कणकवली, तर ११ वाजून १० मिनिटांनी रत्नागिरी स्थानकात येणार आहे.

व्यापारी, उत्पादक, आंबा बागायतदार या ट्रेन मधून आपल्या मालाची ने आण करू शकतात. कोकण रेल्वेच्या चारही स्थानकातील पार्सल कार्यालयात या करिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.