शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 16 जानेवारी 2022 (10:26 IST)

कोरोनाचा विळख्यात आता लहान मुलं

कोरोनाचा विळखा आता मुलांभोवती घट्ट होताना दिसत आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनामुळे लहान मुलं बाधित होणार अशी चिंता आणि शक्यता अनेकदा अभ्यासकांनी दर्शविली आहे. राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. या मध्ये औरंगाबाद शहरात 65 मुले कोरोनाबाधित झाले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या विळख्यात लहान मुले अडकत आहे. राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आधीच्या डेल्टा व्हेरियंट सह आता ओमिक्रॉन ने डोकं वर काढले आहे. लहान मुलं हे देखील आता ओमिक्रॉनच्या विळख्यात अडकली आहे. सध्या मुलांमध्ये ह्याची वेगळी लक्षणे आढळून येत आहे. मुलांमध्ये नाक बंद होणे, घसा खवखवणे, पाठीचा खालचा भाग दुखणे, कोरडा खोकला होणं अशी लक्षणे आढळून येत आहे. श्वास घेताना आवाज येणं. ही सर्व लक्षणे आढळून येत आहे. मुलांना जरी सौम्य लक्षणे असली तरीही वेळीच डॉक्टरांना दाखविणे हा सल्ला देण्यात आला आहे.  काही मुलांमध्ये मल्टी इंफ्लेमेट्री सिंड्रोम चा त्रास दिसत आहे. या मध्ये हृदय, रक्तवाहिन्या, यकृत, कपाळ, डोळ्यात किंवा त्वचेवर सूज येऊ शकते. या कडे दुर्लक्ष करू नये. काहीही लक्षणे आढळ्यास त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधावा.