testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जेव्हा विराट कोहलीने केन विल्यमसनला 11 वर्षांपूर्वी आऊट केलं होतं...

virat kohli
ठिकाण होतं मलेशियातील क्वालालंपूर. तारीख होती 27 फेब्रुवारी 2008. ICC Under-19 वर्ल्ड कपच्या निमित्ताने भारत आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
न्यूझीलंडसाठी तेव्हाही केन विल्यमसन हा आधारवड होता तर युवा टीम इंडियाची धुरा विराट कोहलीकडे होती. संघातील प्रमुख फलंदाज असलेल्या कोहलीने त्या मॅचमध्ये चक्क केन विल्यमसनला बाद करत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. केन नंतर कोहलीने फ्रेझर कोलसनलाही आऊट केलं होतं.

संयमी फलंदाजीसाठी ओळखला जाणारा केन विराटच्या कामचलाऊ गोलंदाजीवर फसला होता.

विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सेमी फायनलचा अडथळा पार केल्यानंतर फायलनमध्ये दक्षिण आफ्रिकेला 12 धावांनी नमवत जेतेपदावर नाव कोरलं होतं.
त्या संघातील विराट कोहली, रवींद्र जडेजा मंगळवारी होणाऱ्या वर्ल्ड कपच्या उपांत्य लढतीसाठी संघात आहेत. तत्कालीन न्यूझीलंडच्या संघातील केन विल्यमसन आणि टिम साऊदी मंगळवारी न्यूझीलंडच्या संघात आहेत.

अकरा वर्षांपूर्वीच्या त्या लढतीतील ते दोघे तरुण खेळाडू आता वनडे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

अकरा वर्षांपूर्वीच्या त्या मॅचमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांची मजल मारली होती. कोरे अँडरसनने सर्वाधिक 70 धावांची खेळी केली होती.
भारतातर्फे सिद्धार्थ कौल, विराट कोहली आणि तन्मय श्रीवास्तव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाला डकवर्थ लुईस पद्धतीनुसार 191 धावांचे लक्ष्य देण्यात आलं. श्रीवत्स गोस्वामीच्या 51 धावांच्या खेळीच्या बळावर टीम इंडियाने हे लक्ष्य गाठलं. कोहलीने 43 धावा करत त्याला चांगली साथ दिली होती.

अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या कोहलीलाच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
दरम्यान, सध्या आंतरराष्ट्रीय पटलावर 'फॅब्युलस फोर'मध्ये विराट कोहली, जो रूट, स्टीव्हन स्मिथ आणि केन विल्यमसन यांची गणना होते.

जगभरात सगळीकडे, कठीण खेळपट्टयांवर, दर्जेदार गोलंदाजांसमोर, प्रतिकूल हवामानात धावांची टांकसाळ उघडणं हा चौघांमधील सामाईक दुवा.

कोहली वनडे आकडेवारी
मॅचेस रन्स सर्वोच्च स्कोअर अॅव्हरेज स्ट्राईक रेट शतकं/अर्धशतकं
235 11285 183 59.70 93.04 41/54

केन विल्यसमन आकडेवारी
मॅच रन्स सर्वोच्च स्कोअर अॅव्हरेज स्ट्राईक रेट शतकं/अर्धशतकं
147 6035 148 47.89 82.15 13/38


योगायोग म्हणजे या चौघांच्या संघांनी वर्ल्डकपची सेमी फायनल गाठली आहे, त्यामुळे हे चौघं एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
मंगळवारी विराट कोहली आणि केन विल्यमसन समोरासमोर असतील. आपापल्या संघांना जिंकून देण्याचं आव्हान या दोघांसमोर आहे.


यावर अधिक वाचा :

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...

पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती

national news
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

रवी शास्त्री पुन्हा टीम इंडियाच्या कोचपदी?

national news
टीम इंडियाचे सध्याचे कोच रवी शास्त्री, भारताचे लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंग यांच्यासह फिल ...

हशीम अमलानं जेव्हा वनडेत विराट कोहलीला टक्कर देणारी कामगिरी ...

national news
हा प्रसंग आहे तेरा वर्षांपूर्वीचा. दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. या ...

टीम इंडियाची वेस्ट इंडीजवर 22 धावांनी मात

national news
रोहित शर्माचं अर्धशतक आणि कृणाल पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या ...

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या केमिस्ट्रीवर लक्ष, टीम ...

national news
मुंबईकर श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. वर्ल्ड कप संघात संधी न मिळालेले मनीष पांडे आणि ...