बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : शनिवार, 14 डिसेंबर 2024 (08:49 IST)

Dattatreya Jayanti 2024 दत्त जयंती कधी आहे? दत्ताचा जन्म कुठे झाला?

Dattatreya Jayanti 2024 : भगवान दत्तात्रेयांची जयंती दत्त जयंती म्हणून ओळखली जाते. महायोगीश्वर दत्तात्रेय हे भगवान श्री विष्णूचे अवतार मानले जातात. तिन्ही दैवी शक्तींनी युक्त भगवान दत्तात्रेय हे सर्वव्यापी आहेत.
चला जाणून घेऊया भगवान दत्त बद्दल...
 
दत्त जन्म किती वाजता झाला आहे?
मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला. 2024 मध्ये दत्तात्रेय जयंती शनिवारी, 14 डिसेंबर रोजी येत आहे. त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते.
 
धार्मिक पुराणानुसार, त्यांचा जन्मोत्सव दत्तात्रेय जयंतीच्या सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो, जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्राचे पठण विधी केले जाते.
दत्ताचा जन्म कुठे झाला?
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे गांव आहे. माहूर गांवाच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका शिखरावर श्रीरेणुकादेवीचे स्थान असून दुसर्‍या शिखरावर श्री दत्ताचा जन्म झाला आहे.
 
श्रीमद्भागवतानुसार महर्षि अत्र्यांनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने व्रत पाळले तेव्हा 'दत्तो मयाहमिति यद् भगवान्‌ स दत्तः'मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केले आहे - असे विष्णूने सांगितल्यामुळे भगवान विष्णूंनी अत्र्यांच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि दत्त म्हणून ओळखले गेले. अत्र्यांचा पुत्र असल्याने त्यांना अत्रेय म्हणतात. दत्त आणि आत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रेय हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांच्या आईचे नाव अनसूया असून त्या पतिव्रता धर्म या नावाने जगात प्रसिद्ध आहे.
दत्त जयंती ला काय करावे?
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांसह लक्ष्मी-नारायणाची पूजा केल्याने धन, सुख आणि सौभाग्य वाढते. याशिवाय भगवान दत्ताची पूजा आणि हवन केल्यानेही ज्ञानात वृद्धी होते, अशी श्रद्धा आहे. दत्ताला पिवळे फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी.
 
भगवान दत्त आपल्या भक्तांना येणारा त्रास लगेच दूर करतात. त्यांच्या मंत्रांमध्ये इतकी चमत्कारिक शक्ती आहे की त्यांचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते. एवढेच नाही तर त्याची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी, ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि अडथळे दूर होतात.