मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : शुक्रवार, 13 डिसेंबर 2024 (14:51 IST)

दत्त जयंती विशेष रेसिपी : केशरी पेढा

Keshari Peda
साहित्य-
खवा - दोन कप
साखर - अर्धा कप
केशर - 1/4 टीस्पून 
वेलची पूड -1/4 टीस्पून 
दूध 
 
कृती-
केशरी पेढा तयार करण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये खवा घ्यावा. व तो चांगल्या प्रकारे मोकळा करून घ्यावा. आता एका छोट्या बाऊलमध्ये केशरधागे घालावे. त्यामध्ये 1 चमचा दूध घालून केशर घोळून घ्यावे. आता एका नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेऊन खवा घालून भाजून घ्यावा. खवा 7 ते 8 मिनट पर्यंत भाजून घ्यावा. आता हा खवा एका प्लेटमध्ये पसरवून घ्यावा. व थंड होऊ द्यावा.15 मिनट नंतर त्यामध्ये वेलची पूड, केशर दूध आणि चवीनुसार साखर घालून चांगल्याप्रकारे मिक्स करावे. तसेच हा खवा अर्धा तास झाकण झाकून ठेऊन द्यावा. व नंतर कणिक मळतो तसा मळून घ्यावा. आता एक एक गोळा घेऊन त्याला तुम्हाला आवडेल तसा पेढयाचा आकार द्यावा. यानंतर प्रत्येक पेड्यावर एक किंवा दोन केशर धागे ठेवा आणि हलके दाबा. जेव्हा सर्व पेढे तयार होतील, तेव्हा ते पुन्हा एकदा चांगले झाकून ठेवा आणि 4-5 तास फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून पेडे व्यवस्थित गोठतील. तर चला तयार आहे दत्त जयंती विशेष रेसिपी केशरी पेढा, चविष्ट केशरी पेढा नैवेद्यात नक्कीच ठेवा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik