1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

दिवाळीची सफाई करताना या 8 वस्तू फेकून द्या

दिवाळीची सफाई करताना अनेक वस्तू आम्ही धुऊन पुसून सांभाळून ठेवून घेतो. पण आपल्याला हे माहीत आहे का की या मोहामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. घरात सकारात्मक वातावरण राहावे म्हणून काही वस्तू बाहेर काढण्याची गरज आहे. जाणून घ्या लक्ष्मी पूजनापूर्वी कोणत्या वस्तू घराबाहेर टाकून द्यावा:
* फुटका आरसा ठेवणे वास्तू दोष आहे. यामुळे कुटुंबातील लोकांना मानसिक ताण सहन करावा लागतो.
 
* दांपत्य जीवनात सुख शांती हवी असल्यास पती-पत्नी ज्या बेडवर झोपत असतील तो तुटलेला नको. जर पलंग तुटका-फुटका असेल तर समस्या उद्भवू शकतात.
 
* बंद किंवा खराब पडलेली घडी घरात लावू नये. या प्रगतीत बाधक असतात. घड्याळ योग्य नसल्यास कोणतेही कार्य वेळेवर पूर्ण होत नाही.
 
* तुटलेली फ्रेम घराबाहेर टाका. कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब किंवा तुटलेली असल्यास घरातून हटवावी.

* घराच्या मुख्य प्रवेश द्वार तुटतं फुटतं असेल तर त्याला लगेच दुरुस्त करवावे. घरातील फर्निचर व्यवस्थित असावे. तुटक्या फुटक्या वस्तू वाईट परिणाम देतात.
 
* जुने पॅक्ड खाद्य पदार्थ जे खूप दिवसांपासून डब्यांमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले असतील ज्यांची एक्सपायरी डेट निघून गेलेली असेल, ते सर्व बाहेर फेका.
* रद्दी पेपर, जुने बिल (कामाचे नसणारे), जुन्या मॅगझिन्स, जुने कॅलेंडर, पॅमप्लेट्स व इतर कागद जे कामाचे नसून वर्षानुवर्ष सांभाळून ठेवलेले असतील ते फाडून फेका.
 
* जुन्या सजावटी वस्तू, तुटलेले खेळणे, डबे, फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला आणि जुन्या फाटक्या चादरी लवकरात लवकर फेकून द्यावा. मागल्या वर्षीचे दिवे लावणे टाळावे. नवीन दिवे घेऊन दिवाळीला ते प्रज्जवलित करावे.