सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

दिवाळी स्पेशल : आकाशकंदील

दीपावलीच्या काळात घरासह अंगण आणि परिसर उजळून प्रकाशमय करणार्‍या आकाश कंदीलांची मागणी वाढते. पारंपारिक


आकार आणि प्रकरांप्रमाणेच दरवर्षी काही नवीन प्रकार आकाशकंदीलात पहावयास मिळतात. हंडी कंदील, पार्यावरणपूरक कंदील यांच्याप्रमाणेच छोट्या आकाराच्या कंदीलांनाही उत्तम प्रसिसाद असतो. या वर्षी बाजारात आलेले आकाश कंदिलांचे पारंपारिक आणि काही नवे प्रकार जाणून घेऊ या-
नवे प्रकारे कोणते?
हंडी कंदील प्रकारात फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहे. पॉल, मेटॅलिक, चायना प्लास्टिकचे प्रकार रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोग्राफी कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, झगमगते आकाशकंदील. पावसाळा संपवून नवी पिके हाती आल्यावर शरद ऋतूच्या मध्यावर अश्विन आणि कार्तिक महिन्याच्या संधिकाळात हा सण येतो. या दिवसात प्रभू रामचंद्र सीतेसह चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आले. त्यावेळी अयोध्यातील प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. असे म्हणतात, की दीपज्योती हे चिरंतन सर्वात्मक परमेश्वराचे प्रतीक आहे आणि म्हणूनच ‍‍दिवाळी आली, की घराघरांवर आकाशदिवे लागतात. विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक कौशल्याचे आकाशदिवेच उच्च अभिरुची दर्शवितात असे नव्हे, तर अगदी साद्या पतंगाच्या कागदापासून तसेच जिलेटिन कागदाच्या पारंपारिक कलाकृतीही आकाशदिव्यांत साजून दिसतात. दीपावली हा सण येतो तोच झगमगत्या दिव्यांना सोबतीला घेऊन. या सणात नि‍रनिराळ्या प्रकाराच्या दिव्यांनी घरे, दुकाने, गल्लीबोळ असा सगळा परिसर झगमगायला लागतो. अंगणात, घराबाहेर, सज्ज्यावर लावल्या जाणार्‍या पणत्या, दिव्यांच्या माळा यामुळे प्रत्येक घर प्रकाशात न्हाऊन निघते. कुणाच्या गॅलरीत, खिडकीबाहेर टांगलेले रंगीबेरंगी आकाशकंदील नावाचे प्रकाशनृत्य आपली नजर खिळवून ठेवते. वैविध्यपूर्ण आकाशकंदीलांतून पडणार्‍या या प्रकाशाने घराचे अंगण उजळून जाते. दिवाळी पहाट, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या दिवशी प्रत्येक घराबाहेर लावलेले आकाशकंदील पाहणेही आनंददायी असते. संध्याकाळी ठिकठिकाणी लखलखणारे हे आकाशदिवेच दिवाळीच्या प्रसन्न, आनंददायी वातावरणाची निर्मिती करतात.

दिवाळीचे रोषणाई खर्‍या अर्थाने जाणवते ती लुकलुकणार्‍या दिव्यांच्या माळा आणि झगमगणार्‍या आकाशकंदीलांमुळेच. दिवाळीच्या दिवसांत पहाटेच्या किंवा संध्याकाळच्या वेळात घराघरांच्या बाहेर, खिडक्यांवर, अंगणात लावलेले रंगीबेरंगी आकाशकंदील पाहण्याची मजा काही औरच असते. एखाद्या घराबाहेर मंद प्रकाश देणारा तर एखाद्या आकाशकंदीलातून हिर्‍यातून पडावा तसा प्रकाश बाहेर पडत असतो, काही ठिकाणी सारा परिसरच प्रकाशाने उजळून गेलेला दिसतो. रस्त्यावरच्या आकाशकंदिलांच्या स्टॉल्समुळे दिवाळीची चाहूल जाणवते आणि तेच वेगवेळग्या प्रकारचे, आकारांचे, रंगांचे आकाशकंदील पाहिले, की मन प्रफुल्लित होते.