1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. दीपावली
Written By वेबदुनिया|

लक्ष्मी एक शक्ती

WD
सर्वसाधारणत: लक्ष्मी या शब्दातून संपत्तीचा आभास होतो. खरं तर या भौतिक साधनांना मानवाच्या गरजेप्रमाणे उपलब्ध करून देण्याच्या क्षमतेला लक्ष्मी म्हटले जाते. पुराणानुसार समुद्रमंथनातून १४ रत्नं प्रकट झाली. लक्ष्मी त्यातीलच एक. ही चौदा रत्नं पुढीलप्रमाणे होती- लक्ष्मी, कौस्तुभ मणि, अप्सरा, अमृत, विष, वारुणी, शंख, ऐरावत, धन्वंतरी, कल्पवृक्ष, चंद्र, कामधेनू, ससाणा, धनुष्य.

WD

लक्ष्मीने प्रकट झाल्यानंतर विष्णूला वरले. लक्ष्मीला धन, संपदा, समृद्धी व ऐश्वर्याची देवी मानले जाते. अध्यात्मामध्ये गायत्रीच्या साधनक्रम किंवा तत्त्वदर्शन धारेला श्री किंवा लक्ष्मी मानले जाते. लक्ष्मीची उपासना केल्याने शरीरातील निद्रिस्त प्रतिभा जागृत होतात ज्यामुळे ऐश्वर्य, समृद्धी व वैभव प्राप्त होते.


WD

आसन :

तंत्रशास्त्रानुसार लक्ष्मीचे आसन कमळ आहे. कमळ चिखलात राहूनही मृदू व सुंदर असते.

स्वरूप :

लक्ष्मी स्त्री स्वरूपा आहे. स्त्री स्वत: एक शक्तीचा स्रोत आहे. तिच्या मुखावर ऐश्वर्यमयी तेज आहे. त्यांना चार हात, एक मुख आहे. जे चार विचार व एक लक्ष्य याचे प्रतिबिंब आहे. दूरदृष्टी, संकल्प, श्रम, शिस्त. यामध्ये दिलेला संदेश हाच आहे की या चारी गोष्टींचा वापर केल्याने तुम्ही यशस्वी व्हाल. लक्ष्मीच्या मुखावरील आशीर्वाद मुद्रा, अनुग्रह व अभय दर्शवते. तर हातातील कमळ सौंदर्यदृष्टी देते.