रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

ऑरेंज किसमिस स्नो

ND
साहित्य : 6-7 संत्री, 500 ग्रॅम दूध, 1 मोठा चमचा क्रीम, 150 ग्रॅम साखर, 2 थेंब ऑरेंज एसेंस, 1 मोठा चमचा ऑरेंज कलर, 15-16 मनुका, 15-16 डाळिंबाचे दाणे.

कृती : सर्वप्रथम संत्र्यांचा वरचा भाग एखाद्या झाकणा सारखा काढून चाकूने कापून घ्यावा. आतील भाग सावधगिरीने काढून रिकाम्या संत्र्यांना फ्रीजमध्ये ठेवावे.

आता संत्र्याच्या आतील भागाला मॅश करावे. दुधाला उकळी आल्यावर त्यात साखर मिसळून थंड होण्यासाठी ठेवावे. त्यात संत्र्याचा रस, ऑरेंज एसेंस आणि कलर घालून फ्रीजरमध्ये जमण्यासाठी ठेवावे. जमल्यावर त्या मिश्रणात क्रीम घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. रिकाम्या संत्र्यात ह्या मिश्रणाला भरावे. वरून किसमिस आणि डाळिंबाचे दाणे घालावे. त्यावर कापलेल्या भागाचे झाकण लावून जमण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवावे. जमल्यावर सर्व्ह करावे.