बुधवार, 16 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

Summer special थंडगार कैरीच पन्ह, जाणून घ्या रेसिपी

साहित्य
दोन- कैरी
चार टेबलस्पून- साखर किंवा गूळ
एक टीस्पून- भाजलेले जिरे पावडर
अर्धा टीस्पून- काळे मीठ
अर्धा टीस्पून- पांढरे मीठ
अर्धा टीस्पून- मित्र पूड
पुदिन्याची पाने
थंड पाणी
कृती-
सर्वात आधी कैऱ्या घ्या व त्या स्वच्छ धुवा आणि प्रेशर कुकरमध्ये २-३ शिट्ट्या येईपर्यंत उकडवून घ्या.
आता थंड झाल्यावर कैऱ्या सोलून त्यामधील गर एका भांड्यात काढून घ्या. काढलेला गर मिक्सरमध्ये घाला आणि त्यात साखर किंवा गूळ घाला आणि ते मिसळा. आता जिरे पूड, काळे मीठ, पांढरे मीठ, मिरे पूड आणि पुदिन्याची पाने घाला आणि पुन्हा मिसळा. तयार मिश्रण एका भांड्यात काढा, थंड पाणी घाला आणि चांगले मिसळा. वर बर्फाचे तुकडे घाला. तयार पन्ह काचेच्या ग्लासमध्ये भरा आणि थंडगार सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik