testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विश्वचषक स्पर्धेवर अर्जेंटिनाचे भवितव्य अवलंबून

ब्रोनिस्टी| Last Modified मंगळवार, 12 जून 2018 (12:28 IST)
अर्जेंटिनाचा संघ रशियात खेळल जाणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कसा खेळ करतो, त्यावर अर्जेंटिनाच्या फुटबॉलचे भवितव्य अवलंबून राहील, असे कर्णधार लिओनेल मेस्सी याने सांगितले.
मेस्सी हा मुलाखत देत होता. आम्ही कशी कामगिरी करतो हे फार महत्त्वाचे राहणार आहे. अर्जेंटिनाला ओळीने तीनवेळा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आम्हाला पत्रकारांशी बोलताना काही वेळा अडचणीचे ठरते, अशी भर बार्सिलोनाच्या आघाडीच्या फळीतील या खेळाडूने सांगितले.

मुलाखत देताना ही अडचण आली. कारण आमच्यामध्ये या तीन अंतिम सामन्यांविषयी वेगवेगळी मतप्रवाह आहेत. अर्जेंटिनाला 2014 च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत जर्मनीशी खेळताना जादा वेळेत 1-0 असा पराभव पत्करावा लागला. कोपा अमेरिका स्पर्धेत 2015 व 2016 अर्जेंटिना अंतिम सामन्यात लागोपाठ चिलीकडून पेनल्टीत पराभूत झाला, असे तो म्हणाला.
मेस्सी हा विश्वचषक स्पर्धेत खेळताना 31 व्या वर्षात पदार्पण करेल. स्पेन, ब्राझील, फ्रान्स आणि बेल्जियम हे चार संघ रशियात खेळल्या जाणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असतील, असेही मेस्सीने सांगितले.

या स्पर्धेत बरेच संघ मोठ्या विश्वासासह रशियात दाखल झाले आहेत. सांघिक आणि वैयक्तिक कौशल्यावर या संघांचा भर राहणार आहे, असे पाच वेळा सर्वोत्तम जागतिक खेळाडूचा पुरस्कार पटकाविणार्‍या मेस्सीने स्पष्ट केले. अर्जेंटिनाचा संघ शनिवार, 16 जून रोजी मॉस्को येथे आइसलँडविरुध्दच्या सामन्याने विश्वचषक फुटबॉल मोहिमेस सुरुवात करणार आहे. त्यानंतर अर्जेंटिना संघ ड गटातील उर्वरित दोन सामने क्रोएशिया व नाजेरियाशी खेळेल.
कोणत्याही आफ्रिकन संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपान्त्पूर्व फेरीच्या पुढे मजल मारलेली नाही. यावेळी या स्पर्धेत अनेक संघात तरुण व कुशल खेळाडूंचा समावेश झालेला आहे. अर्जेंटिनाचा संघ यावेळच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदाचा दावेदार असणार नाही. कारण बरेच अनुभवी खेळाडू आच संघात नाहीत, परंतु हे माझे वैयक्तिक मत आहे, असे मेस्सी म्हणाला.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

छत्रपतींच्या पुतळ्याचे काम २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार

national news
होय मोठी बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकातील अरबी समुद्रात ...

दुष्काळ आहे हे मान्य करता मग जाहीर करा - सचिन अहिर

national news
मुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणतात की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण तरीही ...

टीव्हीपेक्षा जास्त वेळ मोबाइलवर घालवतात भारतीय लोक

national news
नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधानुसार भारतीय लोक टीव्हीपेक्षाही जास्त वेळ मोबाइलमध्ये ...

पोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब

national news
कमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ...

सुवर्णरोखे योजना आजपासून सुरू होणार

national news
चालू आर्थिक वर्षासाठीची सॉव्हरिन गोल्ड बॉण्डस ही सरकारी रोखे योजना 15 ऑक्टोबरपासून सुरू ...