testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अनुष्का साकारणार जर्नालिस्टची भूमिका

anushka
Last Updated: शुक्रवार, 12 सप्टेंबर 2014 (16:47 IST)
राजकुमार हिराणी यांच्या ‘पीके’ सिनेमात आमिर खान एका वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळणार याची उत्सुकता तर सर्वाना आहे. आमिरने सिनेमाच्या पोस्टरवर विवस्त्र होऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता अनुष्का या सिनेमात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार अशी माहिती समोर आली आहे. शूटिंगवेळी अनुष्का विविध लूकमध्ये दिसली आहे. सिनेमात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार असून ती विविध पात्रांविषयी लिहिणार आहे. कहानी सुरु होते, अनुष्काच्या पात्रापासून. ती जर्मनीच्या ब्रुग्समध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेत असते. सुशांत सिंह राजपूत तिच्या बॉयफ्रेंडचे पात्र साकारत आहे. दोघे एकमेकांवर प्रेम करतात मात्र लग्न करू शकत नाहीत. विविध विषयांचा शोध घेत अनुष्का भारतात पोहोचते. तिथे तिची भेट आमिर खानचे पात्र पीकेशी होते. तो देवाला शोधत धरतीवर येतो. पीके तिला अनेक प्रश्न विचारतो. त्यांची उत्तरे तिच्याकडे नसतात. दोघेही या प्रश्नांची उत्तरे शोधायला निघतात. या सिनेमात अनुष्काचा वेगळाच लूक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. समोरून कट केलेले केस तिच्या चेहर्‍यावर आलेले आहेत. तिच्या या वेगळ्या लूकने एक वेगळीच छाप पडत आहे.
यावर अधिक वाचा :

नाजुका आणि रायबा उधळणार 'प्रीती सुमने'

national news
प्रेक्षकांना अगदी लोटपोट हसवणारा 'अगडबम' सिनेमा आठ वर्षांपूर्वी भेटीस आला होता. या ...

नेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी?

national news
अभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदीने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ ...

परमार्थातही चातुर्य असावे

national news
“एकदा रावणाला सेवकाने सांगितले की, तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर "राम" हे नाव काढतो. ...

आमिरवर आली अशी स्थिती बसला गाढवावर

national news
अभिनेता आमीर वर गाढवावर बसण्याची वेळ आली असून त्यानेच ती शेअर केली आहे. झाले असे की ...

'बॉइज २' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'

national news
'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी ...