शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. मैत्री दिन
Written By वेबदुनिया|

एका मैत्रिणीचं पत्रं..

प्रिय सखी,
जीवनाच्या कृतार्थतेच्या टप्प्याजवळ उभी असलेली मी, चारचौघींच्या दृष्टीने सारं काही आलबेल, मुलांची शिक्षण, लग्न सारं काही झालेलं. मुलांचा बालपणाची सय करून देणारा नातू, सून असं असतानाही उगाचच एकटं वाटण्याचं, अस्वस्थ होण्याचं वय, मनातलं अधुरं राहिलेलं काही पूर्ण करता येईल का? या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न. अशातच ‘मधुरांगण’ सुरू होतंय असं कळलं. वाटलं इथं समवयस्कात आपण रमूत म्हणून सभासद व्हायचं ठरलं. रीतसर सोपस्कार पूर्ण झाले.

आपल्याला ही संधी उपलब्ध करून देणारी व्यक्ती कशी आहे, याबद्दल औत्सुक्य होतच. यामुळे मी भेटायला येतीय, येऊ का? या प्रश्नाला ‘हो. याना’ या मिळालेल्या उत्तराने मी आवाक! कारण दिलेली वेळ संपल्यावरही एवढं अगत्य! ते ही नवीन व्यक्तीसाठी, इथंच या मैत्रिणीने आपलंसं केलं मला. भेटल्यावर दुसरा धक्का बसला.एवढुशी, छोटूशी, शांत, काळ्याशार डोळ्यांची, ओठांच्या कोपर्‍यातून सांडणार्‍या मधाळ हास्यासह, अगत्य भरल्या शब्दांनी आपलंसं करणारी. खरंच ही माझी मैत्री मला आमच्या पहिल्या भेटीतच ही मैत्रीण मला खूप भावली.

मरगळलेल्या माझ्या मनावर चैतन्याचं शिंपण करणारी ही माझी छोटीशी मैत्रीण होती ‘स्वाती’स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडणारा थेंब मोती बनतो. अस्सल मोती. ज्याच्या शांत तेजानं उद्विग्नता कमी होते, असे मानले जाते. इथंतर अख्खी स्वातीच मला मिळाली होती. फोनवर प्रसन्न खळाळत्या हास्यासह तिचं बोलणं ऐकलं की, अख्खा दिवस फूलपंखी व्हायचा.माझ्या इतर मैत्रिणी म्हणायचं अशी कोणती आहे तुझी ही मैत्रीण? जिच्या नुसत्या फोनने तुझी मरगळ कमी होते? तिचा हा संयमी व शांत स्वभावच मनाला आकर्षित करून जातो.

चारुशिला गजेंद्र भोसले
अध्यक्ष-इनरव्हिल क्लब