शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. मैत्री दिन
Written By वेबदुनिया|

मैत्रीच्या सरी..

ऑगस्टच्या पहिल्या रविवारी

नेहमीच मैत्रीचा पूर येतो

जिव्हाळ्याच्या या नात्याला

आनंदाच्या ओघात वाहून नेतो

प्रेमाच्या मैत्रीच्या सरी

विश्वासाच्या नभातून कोसळतात

नवचैतन्याच्या शिरशिरीत

दोस्तीच्या गळामिठी घडत

असतात

कुठे शाळेच्या आठवणी तरकुठे

कॉलेजचे कट्टे डोळ्यासमोर

येतात

मस्करी, चेष्टा अन् खोड्या

आठवत

नाते हळूवार जपत असतात

असले कसले हे नाते मैत्रीचे?

जिथं सारं काही विसरून

ऐकमेकांसाठीच जगायला अन्

मरायला होतं

इवलूसं हे रोपटं मग पारंब्याचा

वड कसं काय होतं?