बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2023
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (09:28 IST)

गणेशोत्सव 2023: गणपती समोर नाचताना मंडपात हृदय विकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू

heart attack women
गणेशोत्सव 2023:सध्या गणेशोत्सवाची सर्वत्र धूम आहे. गणेशोत्सव 10 दिवस साजरा केला जात आहे. ठीक ठिकाणी सार्वजनिक मंडळात गणेशोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले जात आहे. आंध्रप्रदेशात धर्मवरम नगरात  गणेशोत्सवात एका कार्यक्रमात नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये दोन तरुण बेभान होऊन नाचत आहे. नाचत नाचता एक तरुण थांबतो आणि अचानक खाली कोसळतो.बेशुद्ध अवस्थेत त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रसाद असे या मयत तरुणाचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याचे समजले आहे.  

अलीकडील हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. जिम मध्ये वर्कआउट करताना देखील तरुण वर्ग हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्युमुखी होत आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit