निरोप बाप्पा ला
बाप्पा घरी आले,अवघे घर देऊळ झाले,
टाळ्या आरत्या ने,घर निनादून गेले,
फुलांचा सुवास दरवळला आसमंतात,
नैवेद्य रूपाने झाले
गोड धोड ही घरात,
लगबग बाप्पा सारी
तुझ्याच भोवती रे,
तू आलास की आनंदास
उधाण येतंय रे,
आज तुला निरोप द्यायची
इच्छा नाही मज,
होते पापणी ओली,
येतो हुंदका हुळूच सहज
जड अंतकरणाने देईन निरोप आज तुजला
पुढच्या वर्षी येण्याचे दे वचन तू सकळा
तो पर्यंत हे सावट ही
होईल नाहीसे
लवकरच संकटाचे काळे ढग,
होतील दिसे नासे!!
अश्विनी थत्ते
नागपूर