सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

अथर्वशीर्ष म्हणताना पाळा हे नियम, मिळेल लाभ

अथर्वशीर्ष 
थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. 
 
भगवान जैमिनी ऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते आणि स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी आणि ध्यान नंतर आहे.
 
 
अथर्वशीर्ष म्हणताना पाळावे हे नियम
 
* उच्चार अगदी स्पष्ट असावे.
* स्तोत्र अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.
* स्तोत्रपठण भावपूर्वक म्हणजे स्तोत्राचा अर्थ समजून झाले पाहिजे. 
* जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे स्तोत्र म्हणावयाचे असते तेव्हा वरदमूर्तये नमः । येथपर्यंतच म्हणावे. त्याच्या पुढे जी फलश्रुती आहे ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी. त्याप्रमाणेच शांतीमंत्र प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदा म्हणावा.
* या स्तोत्राच्या एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.
* स्तोत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे.
* स्तोत्र पाठ करताना धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा.
* पाठ म्हणताना मांडी पालटावी लागू नये याची काळजी घ्यावी.
* दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
* पाठ म्हणण्यापूर्वी वडिलधार्‍यांना तसेच गुरुंना नमस्कार करावा.
* पाठ करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी आणि तांबडे फूल व्हावे. 
* पूजा करणे शक्य नसल्यास निदान गणपतीचे मनोभावे ध्यान करावे, नमस्कार करावा.