1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 18 एप्रिल 2014 (11:38 IST)

मनसेचे कार्यकर्ते आपापसात भिडले, एक जखमी

मुंबईतील उल्हासनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमधील अतंर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनसेच्या कार्यकर्ते आपापसात भिडल्याचे समजते. यात एक कार्यकर्ता जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मोनिका हॉलमध्ये वकिलांची बैठक पक्ष उमेदवार राजू पाटील यांनी बोलाविली होती. या बैठकीत मनसे कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पक्षाने राजू पाटील यांना उमेवारी दिल्याने पक्ष कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. मात्र कार्यकर्त्यांचे हवेदावे पुढे आल्याने हाणामारीची घटना घडल्याची चर्चा आहे. बैठकीला शहर उपाध्यक्ष कपिल अडसूळ हे 15 ते 20 कार्यकर्त्यांसह आले होते. हॉलमध्ये उपस्थित असलेल्या दिनेश आव्हाड यांनी शहर उपाध्यक्ष कपिल अडसूळसह कार्यकर्त्यांना फक्त निमंत्रितांसाठी बैठक असल्याचे स्पष्ट करून बाहेर जाण्यास सांगितले. याचा राग आलेल्या
कपिल अडसूळसह कार्यकर्त्यांनी दिनेश आव्हाडला मारहाण केली आहे. आव्हाडवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.