testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शनैश्चर जयंती

shani
वेबदुनिया|
WD
नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्‌।
छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनैश्चरम्‌

शनिदेवाचा जन्म वैशाख अमावास्याच्या दिवशी दिवसा 12 वाजता झाला होता, म्हणूनच वैशाख अमावास्या शनैश्चर जयंती स्वरूपात साजरी केली जाते. शनि मकर आणि कुंभाचा स्वामी आहे व याची महादशा 19 वर्षाची असते. शनिचे अधिदेवता प्रजापिता ब्रह्मा आणि प्रत्यधिदेवता राम आहे. यांचा वर्ण कृष्ण, वाहन घुबड व रथ लोखंडाने बनलेले आहे. हा प्रत्येक राशीत तीस तीस महिने राहतो. शनि देव हे सूर्य आणि छाया (संवर्णा)चे पुत्र आहे. शनिदेवा विषयी अनेक गैरसमज प्रचलित असले तरी चांगले करणार्‍यांच्या सतत पाठीशी आणि वाईट करण्यार्‍यांवर शनिदेवाचा कोप होतो असे मानले जाते.
शनैश्चर जयंतीच्या दिवशी पाळावयाचे नियम

1. या दिवशी सकाळी उठून शुद्ध पाण्याने अंघोळ करावी.
2. नंतर पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करावे.
3. मंदिरात जाऊन शनि देवताच्या मुर्तीचे मंत्रोपचारद्वारे महाभिषेक करावे.
4 नंतर या मुर्तीला तांदुळाने बनवलेल्या 24 दळांच्या कमळावर स्थापित करे.5. मग काळे तीळ, काळी उडदाची डाळ, फुलं, धूप व तेल इत्यादीने पूजा करावी.
6. शनिदेवला काळे वस्त्र किंवा लोखंडाची वस्तू अर्पित करावी
7. पूजा करताना शनिच्या दहा नावाचे उच्चारण करावे - कोणरथ, कृष्ण, पिप्पला, सौरि, पिंगलो, रोद्रोतको, बभ , मंद, शनैश्चर
8. दिवसा 12 वाजता महाआरती करून प्रसादाचे वितरण करावे.
9. पूजा झाल्यानंतर पिंपळाच्या झाडीची दोर्‍याने सात वेळा परिक्रमा करावी.10 मग खाली दिलेल्या मंत्राद्वारे शनिदेवाची प्रार्थना करावी -
शनैश्चर नमस्तुभ्यं नमस्ते त्वथ राहवे।
केतवे अथ नमस्तुभ्यं सर्वशांतिप्रदो भव।
11 आपल्या आर्थिक स्थितिनुसार ब्राह्मणांना भोजन करावे व लोखंडाची वस्तु, धन इत्यादीचे दान करावे.
12 जर तुमचे मंदिर जाणे संभव नसेल तर घरातसुद्धा शनिदेवाचे स्मरण करून शनि चालीसाचा पाठ करावा. नंतर शनिची आरती करावी.13 शनिच्या पूजेच्या अगोदर जर हनुमानची आराधना केली तर शनिदेव प्रसन्न होतात.


यावर अधिक वाचा :