बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By

गुरू नाही कोणी तर अशी करावी पूजा

सद्गुरू कडून दीक्षा मिळवणारे भाग्यवान असतात. परंतू ज्यांना गुरु उपलब्ध नाही आणि साधना करू इच्छित आहे असे लोकं समाजात अधिक संख्येत आहे. म्हणून ते या प्रयोगाने लाभ घेऊ शकतात.
 
सर्वप्रथम पांढर्‍या वस्त्रावर मूठ भर तांदूळ ठेवून त्यावर कलश-नारळ ठेवावे. उत्तराभिमुख होऊन महादेवाचा फोटो ठेवावा.
 
महादेवाला गुरु समजून खालील मंत्र वाचून श्रीगुरुदेवाचे आवाहन करावे.
 
'ॐ वेदादि गुरुदेवाय विद्महे, परम गुरुवे धीमहि, तन्नौ: गुरु: प्रचोदयात्।।'
हे गुरुदेव! मी आपले आवाहन करत आहे.
 
नंतर यथाशक्ति पूजन करावे, नैवेद्यादि आरती करून 'ॐ गुं गुरुभ्यो नम: मंत्र' 11, 21, 51 किंवा 108 माळ जपाव्या.