शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 18 जुलै 2018 (14:42 IST)

गुरू पौर्णिमेला चंद्रग्रहण, 3 राशींसाठी शुभ तर 4 राशींच्या लोकांना राहावे लागणार आहे सावध ...

चंद्रग्रहण 27 जुलैच्या रात्री 11 वाजून 54 मिनिटांपासून सुरू होऊन सकाळी तीन वाजून 49 मिनिटापर्यंत राहणार आहे. तीन तास 55 मिनिटांचा ह्या ग्रहणाचा सुतक 27 जुलैच्या दुपारी दोन वाजून 54 मिनिटांपासून लागणार आहे.
 
या दिवशी गुरु पौर्णिमा देखील आहे. ग्रहणाचे सुतक लागण्याअगोदर गुरु पौर्णिमेचा सण साजरा करणे श्रेष्ठ आहे.
 
केव्हा पासून केव्हापर्यंत राहणार आहे ग्रहण : ग्रहण 27 जुलै रोजी रात्री 11 वाजून 54 मिनिटावर लागेल. रात्री एक वाजून 52 मिनिटावर मध्य आणि सकाळी तीन वाजून 49 मिनिटावर मोक्ष राहील.
 
कोणत्या राशीसाठी कसे राहणार आहे च्रंदग्रहण :
* मेष, सिंह, वृश्चिक आणि मीन राशीवर चंद्रग्रहणाचा चांगला प्रभाव पडेल.
* मिथुन, तुला, मकर आणि कुंभ राशीसाठी प्रभाव चांगला राहणार नाही आहे.
* वृषभ, कर्क, धनू आणि कन्या राशीवर चंद्रग्रहणाचा प्रभाव संमिश्रित राहील.