testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

500 कुक आणि 752 शेगडीत तयार होतो भगवान जगन्नाथाचा महाप्रसाद, जाणून घ्या याच्याशी निगडित काही रहस्य

Last Modified मंगळवार, 10 जुलै 2018 (14:32 IST)
उड़ीसा स्थित जगन्नाथपुरी सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र धार्मिक स्थळांपैकी ऐक आहे. येथे दरवर्षी जगन्नाथच्या रथयात्रेचे आयोजन केले जाते, यंदा ही यात्रा 14 जुलै 2018पासून सुरू होऊन 10 दिवसापर्यंत चालणार आहे. या रथयात्रेच्या उत्सवात देव जगन्नाथाला रथावर विराजमान करून संपूर्ण शहरात भ्रमण करण्यात येते. प्रत्येक वर्षी लाखोने भाविक या उत्सवात भाग घेतात. जगन्नाथपुरीशी निगडित बरीच मान्यता प्रचलित आहे. ज्यानुसार येथे जगातील सर्वात मोठे स्वयंपाकघर आहे, ज्यात जगन्नाथासाठी प्रसाद तयार केला जातो. तर जाणून घ्या जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाकघराशी निगडित काही रहस्य ...

जग भरात जगन्नाथ मंदिरच्या स्वयंपाकघराची चर्चा आहे. या विशाल स्वयंपाकघरात देव जगन्नाथासाठी प्रसाद तयार केला जातो. ज्याला तयार करण्यासाठी किमान 500 कुक व त्यांचे 300 सहयोगी काम करतात. सांगण्यात येते की स्वयंपाकघरात जो काही प्रसाद तयार करण्यात येतो तो सर्व लक्ष्मीदेवीच्या देखरेखमध्ये तयार होतो.

प्रत्येक दिवशी सर्व कुक मिळून 56 प्रकाराचे प्रसाद तयार करतात. स्वयंपाकघरात तयार होणार्‍या प्रत्येक पदार्थाला जसे हिंदू धर्माच्या पुस्तकांमध्ये सांगण्यात आले आहे तसेच तयार केले जाते. प्रसादात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येत नाही. हा पूर्णपणे शाकाहारी असतो. प्रसादात कांदे लसणाचा वापर केला जात नाही.
maha prasad
देव जगन्नाथ यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रसादाला मातीच्या भांड्यात तयार केले जाते. स्वयंपाकघराजवळ दोन विहीर आहेत ज्यांना गंगा आणि यमुना म्हटले जाते. प्रसाद तयार करण्यासाठी फक्त ह्या विहीरिच्या पाण्याचा वापर केला जातो.
प्रसाद तयार करण्यासाठी 7 मातीचे भांडे एकावर एक ठेवण्यात येतात आणि सर्व प्रसाद लकड्याच्या चुलीवर तयार केला जातो. या प्रक्रियेत सर्वात वर ठेवण्यात आलेल्या भांड्यात प्रसादाचे साहित्य तयार होतात नंतर एकानंतर एक प्रसाद तयार होतो.

सांगायचे म्हणजे हा महाप्रसाद आनंद बाजारात मिळतो, जो विश्वनाथ मंदिराच्या पाच पायर्‍या चढल्यावर येतो. रोज कुक किमान 20 हजार लोकांचे महाप्रसाद तयार करतात. तसेच सणा सुदीच्या वेळेस हा महाप्रसाद 50 हजार लोकांसाठी तयार केला जातो. तुम्ही महाप्रसादाचा आनंद घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग देखील करू शकता.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

विड्याच्या पानांमुळे तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत मिळते

national news
पान खाण्याची परंपरा आमच्या देशात बरीच जुनी आहे. पाहुण्यांना पान खाऊ घालून विद्ध करणे, शुभ ...

विवाहाच्या वाटेवर : सप्तपदी

national news
घरात एकदा लग्न आहे म्हटलं की सारं घरच लग्नमय होऊन जातं. कार्यलय, विविध वस्तूंची खरेदी, ...

गजानन बावन्नी

national news
जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ।।१।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात ...

हनुमानाचे सीतेला न आणायचे कारण?

national news
पवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि ...

गुड फ्रायडे निमित्त : शत्रूवर ही प्रेम करा

national news
जगभर साजरा होणारा सण-शुभ शुक्रवार! प्रामुख्याने जे लोक हा सण साजरा करतात. त्यांच्या ...

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...