शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (20:17 IST)

चाणक्य नीती: या 6 वाईट सवयी आपले विनाश करतात

आचार्य चाणक्य एक कुशल आणि योग्य रणनीतीकार होते. त्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणून ओळखले जायचे. व्यक्तीच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी नीतिशास्त्र चाणक्यनीती पुस्तक लिहिली. चाणक्यानुसार माणसांच्या काही वाईट सवयी त्यांचा विनाश करू शकतात. आचार्य चाणक्य म्हणतात की वेळेतच या सवयींना सोडून देणे आवश्यक आहे. 
 
1 फसवणूक करणारे लोक -
चाणक्यानुसार जे लोक फसवणूक करून किंवा वाईट कृतीतून पैसे कमावतात त्यांच्या कडे जास्त काळ पैसे राहत नाही. असे लोक समस्याने वेढलेले असतात. ज्यामुळे लवकरच त्यांचे पैसे वाया जातात.
 
2 सकाळी उशिरा उठणारे लोक -
जे लोक सकाळ ते संध्याकाळ पर्यंत झोपतात, त्यांच्या वर आई लक्ष्मी कधीच कृपा करत नाही. सूर्योदयानंतर झोपणाऱ्या लोकांना नेहमी दारिद्र्याला सामोरी जावं लागत.
 
3 जास्त प्रमाणात खाणारे लोक -  
जे लोक गरजेपेक्षा जास्त खातात ते दरिद्री होतात कारण गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्यामुळे माणूस गरीब होतो,तसेच असे व्यक्ती कधी ही निरोगी राहत नाही.
 
4 वाईट बोलणारे लोक -
जे लोक आपल्या बोलण्यावर संयम ठेवत नाही किंवा कठोर बोलतात त्यांच्या कडे लक्ष्मी कधीच थांबत नाही. कारण दुसऱ्या लोकांच्या मनाला दुखवणाऱ्यांवर लक्ष्मी रागावते. असे लोक गरीब होतात.
 
5 रोज दात स्वच्छ न करणारे लोक -
आचार्य चाणक्य म्हणतात की जे लोक आपले दात दररोज स्वच्छ करत नाही त्यांच्या कडे लक्ष्मी कधीच थांबत नाही. अशा लोकांवर लक्ष्मी रागावते आणि दारिद्र्य येत.
 
6 घाणेरडे राहणारे लोक -
आचार्य म्हणतात की जे लोक आपल्या सभोवताली घाण ठेवतात, घाणेरडे कपडे घालतात अशा लोकांकडे लक्ष्मी कधीच राहत नाही. अशा लोकांना समाजात आदर देखील मिळत नाही.