मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 15 जुलै 2020 (10:41 IST)

डोकं झाकण्याची प्रथा आणि त्यामागील कारण, 10 मनोरंजक तथ्य

डोकं झाकण्याची प्रथा हिंदू धर्माची देणगी आहे. प्राचीन काळी राजा मुकुट घालायचे. प्राचीन काळी सर्वांचे डोकं झाकलेले असायचे, प्रत्येक प्रांताचे स्वतःचे पोशाख असायचे ज्यामध्ये डोक्यावर पगडी घालायची प्रथा होती. राजस्थान, माळवा आणि निमाडच्या ग्रामीण भागात आजतायगत काही लोक डोक्यावर साफा बांधतात. बायका फक्त डोक्यावर ओढणी किंवा पदरच घेत असायचा. अश्या वेळेस देऊळात जाताना देखील डोकं झाकलेलं असायचं.
 
1 मान देण्यासाठी (आदराचे सूचक) : पुराण्या मान्यतेनुसार असे म्हणतात की आपण ज्यांना मान देता त्यांच्यासमोर नेहमी डोकं झाकून जावं. याच कारणास्तव बायका अजून देखील जेव्हा आपल्या वडीलधाऱ्यांना भेटल्यावर, डोकं झाकून घेतात. हेच कारण आहे की आपण देऊळात जाताना आपलं डोकं झाकून घेतो.
 
2 सन्मान सूचक : डोकं झाकणं देखील आदरार्थी मानले गेले आहेत. काही जण डोक्याच्या पगडीला आपल्या सन्मानाशी जोडतात. पूर्वी राजांसाठी त्यांचे मुकुट हे सन्मानाचे सूचक होत. अशामध्ये काही लोक असे मानतात की ज्यावेळी आपण देऊळात गेला तर आपला मान, प्रतिष्ठा, सर्वकाही देवाच्या चरणी अर्पण करावं. म्हणजे आपलं डोकं उघडं ठेवावं.
 
3 मनाची एकाग्रता : हिंदू धर्मानुसार, डोक्याच्या मध्यभागी सहस्त्रार चक्र असतं. ज्याला ब्रह्मा रंध्र देखील म्हणतात. आपल्या शरीरात 10 दारं असतात 2 नाकपुड्या, 2 डोळे, 2 कान, 1 तोंड, 2 गुप्तांग आणि डोक्याच्या मध्यभागी 10 वे दारं असतं. दहाव्या दारानेच आपण परमात्म्याशी संपर्क साधू शकतो. म्हणूनच पूजेच्या वेळेस किंवा देऊळात प्रार्थना करताना डोक्याला झाकून घेतल्याने मनाची एकाग्रता बनलेली राहते. पूजेच्या वेळी पुरुष आपली शेंडी बांधतात याबद्दल देखील अशी श्रद्धा आहे.
 
4 हेल्मेट सारखं : डोकं माणसाच्या अवयवातील सर्वात संवेदनशील जागा आहे आणि या संवेदनशील जागेस हवामानामुळे, जंताचा हल्ला, दगड लागणे, पडणे, किंवा भांडण तंट्यापासून डोक्याला वाचण्यासाठी डोक्यावर पगडी, साफा, किंवा टोप घालायचे, जसं की आजकाल गाडी चालविण्यासाठी हेल्मेट आवश्यक झाले आहे.
 
5 आजारापासून बचाव : केसांच्या चुंबकीय सामर्थ्यामुळे डोक्याच्या केसांमध्ये आजार पसरविणारे जंत सहजपणे चिटकून जातात आणि हे केसांमधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि माणसाला आजारी करतात. असे म्हणतात की आकाशीय विद्युत तरंग खुल्या डोक्याच्या माणसांमध्ये जाऊन त्यांना रागीट, डोकेदुखी, डोळ्यामध्ये अशक्तपणा यासारखे आजारांसाठी कारणीभूत असतात.
 
6 डोक्याचे परिधान : डोक्याच्या परिधानाला कपालिका, शिरस्त्राण, शिरावस्त्र, किंवा शिरोवेष देखील म्हटलं जातं. कपालिकाचे बरेच प्रकार आहे. प्रत्येक प्रांतामध्ये ह्याचे वेगवेगळे नाव, रंग आणि रूप असतात. पूर्वीच्या काळी राजा महाराजांचे तर एकापेक्षाएक शैलीचे टोप, पगडी किंवा मुकुट असायचे. पण आपण इथे सामान्य लोकाने परिधान केलेल्या कपालिका बद्दलच बोलू या. इथे लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे टोपी आणि पगडी ह्यांच्यात अंतर आहे.
 
7 साफा : इथे आपण साफ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर माळव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराचं साफा आणि राजस्थानमध्ये वेगळ्या प्रकाराचा साफा बांधतात ह्याला पगडी किंवा फेटा असे ही म्हणतात. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, गुजरात मध्ये हे वेगळे प्रकाराचे असतात. तर तामिळनाडू मध्ये वेगळं असत. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात जवळजवळ सर्व भारतीय हे परिधान करत असतं. राजस्थानात देखील मारवाडी साफा वेगळं तर सामान्य राजस्थानी साफा वेगळा असतो मुघलांनी अफगाणी, पठाणी आणि पंजाबी साफे स्वीकारले आहेत. शीख बांधावाणी या साफ्याना जडड्यांमध्ये रूपांतरित केले आहे. ज्यामुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळते.
 
8 राजस्थानी साफा : राजस्थानमधील रजपूत समाजात साफ्याचे वेगवेगळे रंग आणि बांधण्याची वेगवेगळी शैली वापरली जाते, जसे की युद्धात राजपूत सैनिक भगवा साफा घालत होते. म्हणून भगवा रंगाचा साफा युद्ध आणि शौर्याचं प्रतीक बनलं. सामान्य दिवसात राजपूत वृद्ध खाकी रंगाचा गोल साफा डोक्यावर बांधत असत आणि काही वैशिष्ट्य समारंभात पंचरंगा, चुंदडी, लहरीया सारखे रंग बेरंगी साफे उपयोगात घेत होते. पांढरा रंगाचा साफा शोकार्थी मानला जातो म्हणून राजपूत समाजात शोकग्रस्त माणसंच पांढऱ्या साफ्याचा वापर करतात.
 
9 मांगलिक आणि धार्मिक कार्यात साफा : आजही मांगलिक आणि धार्मिक कार्यांमध्ये साफा घालण्याची पद्धत आहे जेणे करून कोणत्याही प्रकारच्या विधींमध्ये आदर, संस्कृती, आणि आध्यामिकतेची ओळख होते. ह्याचे इतर ही महत्त्व आहेत. लग्नामध्ये घरटी आणि वराडी पक्षातील लोकं साफा घातल्यामुळे लग्नसमारंभात एक वेगळीच शोभा येते. ज्या मुळे समारंभात एक वेगळीच ओळख निर्माण होते.
 
10 टोपी : टोपी डोक्याचे असे परिधान आहे जे बहुतेक भारतीय नेहमी घातलेले असतात. ज्या गांधींच्या टोपीला गांधी टोपी म्हटलं जात त्या गांधी टोपीला बहुदा गांधीजीने कधीही घातलं नसणार वास्तविक ही टोपी महाराष्ट्राच्या खेडेगावात घालण्याची पद्धत आहे अश्या प्रकारे हिमाचल टोपी, नेपाळी टोपी, तमिळ टोपी, मणिपुरी टोपी, पठाणी टोपी, हैदराबादी टोपी इत्यादी अनेक प्रकाराच्या टोप्या असतात भारतात अनेक प्रकाराच्या टोप्या प्रख्यात आहेत.