गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व आणि उपयोग

तुळशीचे विविध प्रकार बघायला मिळतात... जसे कृष्ण तुळस, लक्ष्मी तुळस, राम तुळस, भू तुळस, नीळ तुळस, श्वेत तुळस, रक्त तुळस, वन तुळस, ज्ञान तुळस इतर. तर जाणून घ्या हिंदू धर्मात तुळशीचं महत्त्व काय आहे ते-
 
1. प्रभू विष्णूंना सर्वात प्रिय आहे तुळशीचं पान. देवाला नैवेद्य दाखवताना किंवा त्यांना जल अर्पित करताना त्यात एक तुळशीचं पान ठेवणे आवश्यक असतं.
 
2. तुळशीचं पान सेवन केल्याने शरीराला कोणत्याही प्रकाराचा आजार किंवा शोक होत नाही. दररोज 4 तुळशीचे पान सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने मधुमेह, रक्त विकार, वात, पित्त, कर्करोग इतर आजार नाहीसे होतात.
 
3. तांब्याच्या लोट्यात एक तुळशीचं पान घालून ठेवावं. तांबा आणि तुळस दोघांमध्ये पाणी शुद्ध करण्याची क्षमता असते. दूषित पाण्यात देखील तुळस घालून पाणी शुद्ध करता येतं.
 
4. तुळशीसमोर आसन घालून काही वेळ व्यतीत केल्याने श्वास आणि अस्थमा सारख्या आजारापासून मुक्ती मिळते.
 
5. वास्तू दोष दूर करण्यासाठी तुळस अग्नी कोण ते वायव्य कोण या मधील रिकाम्या स्थानी लावणे योग्य ठरेल. तेथे जमीन नसल्यास कुंड्यात देखील तुळस लावता येईल.
 
6. आपल्या घरावर संकट येणार असल्यास याबद्दल सर्वात आधी तुळशीला ज्ञान होतं त्यामुळे तुळस वाळून जाते. आपण कितीजरी जपत असाल तरी अशा वेळी तुळस वाळू लागते.