मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

108 मण्यांची का असते जपमाळ?

हिंदू धर्मात जप करण्याचे खास महत्त्व आहे. मंत्र जपण्यासाठी वापरण्यात येणार्‍या जपमाळेत 108 मणी असतात. परंतू काय आपल्या हे माहीत आहे यातील मण्यांची संख्या ही 108 का असते?
मान्यतेप्रमाणे माळाचे 108 मणी आणि सूर्याची कला यात संबंध आहे. एका वर्षात सूर्य 216000 कला बदलतो आणि वर्षात दोनदा आपली स्थितीही बदलतो. 6 महिन्याचे उत्तरायण आणि 6 महिन्याचे दक्षिणायन असतं. सूर्य 6 महिन्याचा एका स्थितीत 108000 वेळा कला बदलत असतो.
 
या संख्येतून (108000) शेवटले तीन शून्य हटवून माळेतील 108 मणी निर्धारित केले गेले आहे. माळेतील एक-एक मणी सूर्यातील एक-एक कलेचा प्रतीक आहे. सूर्य हा एकमेव साक्षात दिसणारा देव आहे यामुळे सूर्याचा कलांवर मण्यांची संख्या निर्धारित केली गेली आहे.
 
अशीही मान्यता आहे की ज्योतिष शास्त्राप्रमाणे एकूण 27 नक्षत्र आहेत आणि त्यात एकूण 108 चरण असतात. माळेतील एक-एक मणी एक-एक चरणाचे प्रतिनिधित्व करतं.