1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (12:02 IST)

एकाग्रता

एकाग्रता मनाला तीक्ष्ण करते आणि विश्रम मनाचा विस्तार करतो. धार नसलेले फक्त विस्तृत मन असेल तर पवित्र विकास होऊ शकत नाही. तसेच तीक्ष्ण धार असलेले पण संकुचित मन असेल तर ते तणाव, राग आणि निराशेला कारणीभूत ठरते.
 
एकाग्र मन आणि विस्तृत चेतना यांच्या संतुलनाने निष्णातपणा येतो. सुदर्शन क्रिया आणि अँडव्हान्स्ड कोर्समधील प्रक्रियांचा हेतू, अशा चेतनांचा विकास करणे आहे, ज्या तीक्ष्ण आणि अमर्यादित आहेत. 
 
सेवा आणि बांधिलकी या त्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवाय अन्न आणि वृत्ती यांचाही परिणाम होतो. विस्तृत चेतना म्हणजे शांती आणि आनंद. एकाग्र चेतना म्हणजे प्रेम आणि निर्मिती क्षमता. एकाग्र चेतनेचा एक बिंदू म्हणजे स्वत्व. जेव्हा विस्तृत चेतनेचा प्रत्येक  अणू तीक्ष्ण आणि एकाग्र बनतो तेव्हा दिव्यत्व जागृत होते.
 
श्री श्री रविशंकर ‘मौन एक उत्सव’ मधून साभार