1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2016 (17:03 IST)

महाभारतात हनुमानाची काय भूमिका होती? जाणून घ्या

तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की हनुमान महाभारतात दोन वेळा दिसले होते. रामायणात प्रमुख भूमिका साकारणारे हनुमान महाभारतात महाबली भीमाशी पांडवांच्या वनवासाच्या दरम्यान भेटले होते. यांना चिरंजीवी देखील म्हटले होते, अर्थात यांना सदैव जिवंत राहण्याचा वरदान मिळाला होता आणि हनुमानाला चिरंजीवी राहण्याचा वरदान मिळाला होता. बर्‍याच जागेवरतर असे ही म्हटले आहे की भीम आणि हनुमान दोघेही भाऊ आहे कारण भीम आणि हनुमान दोघेही पवनपुत्र होते.  
 
पहिल्यांदा हनुमान भीमाशी पांडवांच्या वनवासाच्या वेळेस भेटले होते आणि दुसर्‍यांदा युद्ध दरम्यान अर्जुनाची रक्षा करण्यासाठी त्यांच्या धुवाजमध्ये निवास केला होता. महाभारतात हनुमानाची भूमिकेची पूर्ण कथा एका.  
 
हनुमानाची भीमाशी प्रथम भेट   
द्वापर युगात हनुमान भीमाची परीक्षा घेतात. महाभारताचा प्रसंग आहे की एक वेळा द्रौपदीने भीमाशी म्हटले होते की त्याला सौगंधिका फूल हवे आहे आणि भीम त्या फुलाच्या शोधात निघाला. तेवढ्यात त्याच्या रस्त्यात एका वृद्ध वानर लेटलेला दिसला. हे बघून भीमाने वानराला म्हटले की तो आपली शेपूट हटवून घे ज्याने त्याला जाण्याचा रस्ता मिळेल. यावर तो वानर म्हणाला मी फार वृद्ध आहे आणि आपली शेपूट बाजूला नाही करू शकत. तेव्हा भीमाने त्या वृद्ध वानराची शेपूट हटवण्यासाठी पूर्ण शक्ती लावली. पण शेपूट काही केल्या सरकली नाही. तेव्हा भीमाला जाणवलं की हा कोणी साधारण वानर नाही आहे. भीमाने त्याला विचारले की तुम्ही कोण आहात, तेव्हा हनुमान आपल्या अस्सल रूपात आले आणि भीमाला आशीर्वाद दिला.   
 
अर्जुनचा रथ 
एक दिवस श्रीकृष्णाला सोडून अर्जुन एकटाच वनात विहार करण्यासाठी गेला. फिरता फिरता तो दक्षिण दिशेत रामेश्वरम येथे पोहोचला. जेथे त्याला श्री रामाने बनवलेला सेतू दिसला. हे बघून अर्जुनने म्हटले की त्यांना सेतू बनवण्यासाठी वानरांची गरज का म्हणून पडली ते तर स्वत:च सर्वश्रेष्ठ धनुर्धर होते. त्यांच्या जागेवर मी असतो तर हा सेतू बाणांनी बनवला असता. हे ऐकून हनुमान म्हणाला की बाणांनी बनलेला सेतू एकही व्यक्तीचा भार घेऊ शकणार नाही. तेव्हा अर्जुनाने म्हटले की जर मी बनवलेल्या सेतू तुझ्या चालल्याने तुटला तर मी अग्नीत प्रवेश करेन आणि जर नाही तुटला ती तुला अग्नीत प्रवेश करावा लागेल. हनुमानाने ती अट स्वीकारली. तेव्हा अर्जुनाने आपल्या प्रचंड बाणांनी सेतू तयार केला. पण जसाच सेतू तयार झाला हनुमानाने विराट रूप धारण केले. हनुमानाने रामाचे स्मरण करत त्या बाणांच्या सेतूवर पाय ठेवला. पहिले पाऊल ठेवताच सेतू डगमगवायला लागला, आणि दुसरा पाय ठेवताच सेतू पडला. हे बघून अर्जुनाने स्वत:ला संपवण्यासाठी अग्नीत उडी मारण्याचा प्रयत्न केला असता तेव्हाच श्रीकृष्ण प्रकट झाले आणि अर्जुनाला म्हटले की तू परत सेतू तयार कर पण या वेळेस श्री रामाचे नाव घेऊन बनव मग तो पडणार नाही. दुसर्‍यांदा सेतू तयार झाल्यानंतर हनुमान परत त्यावर चालले   पण या वेळेस सेतू पडला नाही. यामुळे खूश होऊन हनुमानाने अर्जुनाला म्हटले की युद्धाच्या शेवटापर्यंत त्याची रक्षा करेल. म्हणून कुरुक्षेत्राच्या युद्धात अर्जुनाच्या रथच्या दुवाजात हनुमान विराजमान झाले आणि शेवटापर्यंत त्याची रक्षा केली. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या शेवटच्या दिवशी कृष्णाने अर्जुनाला आधी रथावरून उतरण्यासाठी सांगितले, त्यानंतर कृष्ण रथावरून उतरले. कृष्णाने हनुमानाचा धन्यवाद केला की त्याने त्यांची रक्षा केली. पण जसेच हनुमान अर्जुनाच्या रथातून उतरले तशीच रथाला आग लागली. हे बघून अर्जुन हैराण झाला. कृष्णाने अर्जुनाला सांगितले की कशी दिव्य शस्त्रांनी हनुमान त्याची रक्षा करत होता. यामुळे आम्हाला माहीत पडत की कसे हनुमानाने फक्त रामायणातच नव्हे तर महा भारतात देखील एक महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.