testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हुताशनी पौर्णिमा

वेबदुनिया|
पौर्णिमेचे हुताशनी पौर्णिमा हे नाव आहे. या दिवशी प्रदोष काळी पेटविली जाते. याची पौराणिक कथा - हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलिकेला अग्नी जाळी शकणार नाही असा वर होता. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीवर बस असे सांगितले. कारण प्रल्हाद मरेल व ती जिवंत राहील. पण झाले उलटे होलीका मरण पावली व प्रल्हाद जिवंत राहिला. ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली. म्हणून या दिवशी सर्वत्र होळ्या पोटवून आनंद व्यक्त करतात. शिवांनी मदनाला जाळले तोही दिवस हाच होता. मदन दहनाच्या आठवणीसाठी म्हणून होळी पेटवतात.
तसेच ढुंढा नावाची राक्षसी होती. ती लहान मुलांना त्रास देत असे. तिला हाकलून देण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. तेव्हा लोकांनी बीभत्स शिव्या दिला. तेव्हा ती निघून गेली. आजही समाजात ‍वीभत्स बोलणारी, शिक्षा द्याव्यात असे वाटणारी मंडळी आहेत. त्यांना वर्षातून एकदा या गोष्टी करण्याची मुभा धर्मशास्त्राने या दिवसापुरती दिली आहे. जशी घाण पाण्याला वाट करुन द्यावी लागते तसाच हा प्रकार आहे. विषवृत्तावर सूर्य येतो तो 21 मार्च रोजी. याच्या जवळपास होळीचा सण येतो. उष्णता वाढीस लागते. होळी लावल्याने जमीन तापते, जमिनीलगतचा थर तापतो. यावेळी होळी लावल्याने उष्णता वाढते. म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस चांगला पडतो. हे यामागील विज्ञान असावे. देवालयासमोर, मोकळ्या मैदानात होळी लावावी. होळी लावल्यावर पालथ्या हाताने बोंब मारतात. यामुळे मनातील वाईट प्रवृती शांत होतात.

विद्याधर करंदीकर


यावर अधिक वाचा :

जानवे घालण्याचे 9 फायदे

national news
जानवं हे उपवीत, यज्ञसूत्र, व्रतबंध, बलबन्ध, मोनीबन्ध आणि ब्रह्मसूत्र या नावाने देखील ...

ख्रिसमस उत्सवासाठी तयार होऊन जा, हे आहे 5 सर्वोत्तम ठिकाणे

national news
ख्रिसमस उत्सवात आता काहीच दिवस बाकी आहे. अशामध्ये आम्ही आपल्याला देशाच्या काही उत्कृष्ट ...

जाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....

national news
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...

नाताळ – एक अद्वितीय सण

national news
नाताळ अर्थात ख्रिसमस हा सण प्रभू येशू यांचा जन्मदिन म्हणून २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला ...

सांताक्लॉझ आहे तरी कोण!

national news
मुलांचा लाडका सांताक्लॉज फिनलॅन्डच्या लेपलॅन्ड प्रदेशात राहतो. रोवानिमी हे त्याच्या ...

राशिभविष्य